जून ते ऑक्टोबर, 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी / पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत … GR | Heavy rain damage compensation

Heavy rain damage compensation:जून ते ऑक्टोबर, २०२४ (मुख्यतः माहे ऑगस्ट व सप्टेंबर) या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी / पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत …

शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र. सीएलएस-२०२३/प्र.क्र.२८६ (१)/म-३, दि.३०.०९.२०२४

२) शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र. सीएलएस-२०२३/प्र.क्र.२८६/म-३, दि.१०.१२.२०२४

३) विभागीय आयुक्त, नाशिक यांचे पत्र क्र. मशा/कार्या/ज-३/आ.१३३२७७७/जा. क्र/२०२५, दि.१७.०२.२०२५

राज्य शुध्दीपत्रकः-

विभागीय आयुक्त, नाशिक यांनी संदर्भ क्र.३ येथील दि.१७.०२.२०२५ रोजीच्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून अतिवृष्टी / पुरामुळे शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीसाठी निर्गमित करण्यात आलेल्या उपरोक्त संदर्भाधीन क्र.२ येथील दि.१०.१२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामधून, दि.३०.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजूर केलेल्या निधीची द्विरूक्ती झाल्याने सदर निधी वगळण्यात येत आहे.

२. तसेच, अतिवृष्टी / पुरामुळे शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीसाठी निर्गमित करण्यात आलेल्या उपरोक्त संदर्भाधीन क्र. २ येथील दि.१०.१२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये, संदर्भाधीन क्र.१ येथील दि.३०.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी मंजूर केलेल्या निधीची द्विरूक्ती झालेली आहे. त्यामुळे, दि.१०.१२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामधील छत्रपती संभाजीनगर विभागामधील अनुक्रमांक (११-परभणी, १२-हिंगोली, १३- नांदेड, १४-बीड) या जिल्हयांची एकूण रू.१५३८.८९ लक्ष इतकी रक्कम वगळण्यात येत आहे.

३. त्या अनुषंगाने उपरोक्त दिनांक १०.१२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये, (१) नाशिक जिल्ह्यासाठी, (२) छत्रपती संभाजीनगर विभागासाठी तसेच, (३) राज्याच्या एकूण बाधित शेतकरी संख्या / बाधित क्षेत्र / मंजूर निधीमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा वाचण्यात यावी.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

IMG 20250609 WA0053

Leave a Comment