राज्य सरकारी कर्मचारी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित सरकारी_कर्मचारी.State Employees New GR

State Employees New GR :सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्थापनेवरील मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग, कोकण भवन, नवी मुंबई (एस-२९ रु.१३११००-रु.२१६६००) हे पद सचिव, राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभाग, कोकण भवन, नवी मुंबई (एस-३०: रु.१४४२००-रु.२१८२००) या वेतनश्रेणीत ०२ वर्षांच्या कालावधीसाठी किंवा श्री. शेलार हे श्रेणी उन्नत सचिव पदावर कार्यरत असेपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तो पर्यंतच्या कालावधीसाठी श्रेणीउन्नत करण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे. तद्नंतर श्रेणी उन्नत केलेले सचिव (राष्ट्रीय महामार्ग) हे पद आपोआप मूळ पदात, म्हणजेच मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) (एस-२९ : रु.१३११००-२१६६००) या पदात रुपांतरीत होईल.

२. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील मुख्य अभियंता (स्थापत्य) (वेतसंरचना एस-२९: रु.१३११००-२१६६००) या निम्न संवर्गातील श्री. संतोष शेलार यांना संदर्भाधीन शासन अधिसूचनेन्वये विहित केलेल्या सेवाप्रवेश नियमानुसार, सचिव व सचिव समकक्ष (तांत्रिक) (वेतनसंरचना एस-३० रु. १४४२००-२१८२००) या वरिष्ठ संवर्गात सन २०२५-२६ च्या नियमित निवडसूचीमध्ये ज्येष्ठतेनुसार, तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात येत आहे. तसेच, सचिव व सचिव समकक्ष (तांत्रिक) म्हणून त्यांची पदस्थापना त्यांच्या नांवासमोर स्तंभ-५ मध्ये दर्शविलेल्या पदावर करण्यात येत आहे.

सदर पदोन्नती ही मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्रमांक २८३०६/२०१७मधील अंतिम निर्णयास अधीन राहून तसेच, रिट पिटीशन स्टॅप नं.१०८७६/२०२१ व रिट पिटीशन स्टॅप नं. १०८७८/२०२१ मध्ये, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दि.२५.०५.२०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार सदर पदोन्नती नमूद रिट याचिकेत होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहील.

#. सदर पहोचती ही तात्पुरत्या स्वरुपाची आहे.

३. श्री. इं ना देण्यात आलेली सदर पदोन्नती ही कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवत आहे.

४. श्री. शेला नी कमीत कमी पदग्रहण अवधी घेऊन नव्या पदाचा पदभार स्वीकारावा व आपला पदग्रहण अहवाल शासनास विनाविलंब सादर करावा. महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदीनुसार पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी पदोन्नती आदेश निघाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत पदस्थापनेच्या पदावर रुजू होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकारी पदोन्नतीने पदस्थापनेच्या पदावर या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या विहित मुदतीत रुजू न झाल्यास त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा अकार्यदिन (dies non) म्हणून गणला

जाईल. श्री. शेलार हे आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या विहित मुदतीत अथवा पूर्व मान्यतेने रुजू होण्यासाठी मंजूर केलेल्या वाढीव कालावधीत रुजू न झाल्यास, त्यांना पदोन्नतीत स्वारस्य नाही, असे समजून त्यांच्या पदोन्नतीचे आदेश आपोआप रद्द झाल्याचे समजण्यात येईल.

५. संबधित नियंत्रक अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, त्यांनी श्री. शेलार यांना पदोन्नतीउपरांत नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगावे. तसेच, विहित कालावधीत संबंधित अधिकारी रुजू न झाल्यास, त्याबाबत शासनास त्वरीत अवगत करण्यात यावे, जेणेकरुन संबंधितांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई त्वरीत करणे शक्य होईल. या आदेशान्वये पदोन्नती/पदस्थापना देण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांचे, म. ना. से. (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार रजा अर्ज स्वीकारु नये/ मंजूर करु नये.

६. श्री.र यांचे लक्ष महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम-२३ कडे वेधण्यात येत आहे. सदर नियमातील तरतूदी लक्षात घेता, त्यांनी पदस्थापनेत बदल करण्यासाठी कुठल्याही स्वरुपाची आवेदने सादर केल्यास ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील.

७. संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, सदर अधिकाऱ्याला पदोन्नतीने पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कोणत्या दिनांकास कार्यमुक्त केले आणि ते पदस्थापनेच्या ठिकाणी कोणत्या दिनांकास हजर झाले, याबाबत शासनास doser1.pwd@maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर त्वरित अवगत करावे.

८. श्री. शे यांनी पदोन्नतीच्या पदावर पदग्रहण केल्यापासून एक महिन्याच्या आत वेतन निश्चितीचा विकल्प द्यावा. वेतननिश्चितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत विकल्प न दिल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्र.११ (१) (ए) अनुसार पदोन्नतीचा दिनांक विचारात घेवून त्यांची पदोन्नतीच्या पदाची वेतननिश्चिती करण्यात येईल.

Leave a Comment