माहे जुन पेड इन जुलै 2025 वेतन अदा करणेबाबत महत्वपुर्ण अपडेट ; शासन परिपत्रक निर्गमित | State Employees June Month In Salary

State Employees June Month In Salary:विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व २) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व ३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई.४) अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व

विषय- संच मान्यता पोस्ट मॅपींग पश्चात उच्चतम मंजूर पदाच्या मर्यादेत वेतन आहरित करणेबाबत.

संदर्भ १. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/शिक्षक शिक्षकेतर/संचमान्यता पोस्ट मॅपींग/२०२५/टि-७/१३७८ दि. २०.३.२०२५

२. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२०२५ (टि-७/)/ शालार्थ/पोस्ट मॅपींग/१७९७ दि. २.४.२०२५

३. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२०२५ (टि-७/)/ शालार्थ/पोस्ट मॅपींग/१९४७ दि. १५.४.२०२५

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, राज्यातील माध्यमिक शाळांच्या (अनुदानित/अंशतः अनुदानित) सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यता आधारे पोस्ट मॅपींग प्रक्रिया पूर्ण होत आहे.

त्यानुसार NIC कडील संचमान्यता API चा वापर करून संचमान्यता व शालार्थ प्रणाली यांचे Interpetition करून शालार्थ प्रणाली अद्ययावत करण्यात येत आहे.

सोने खरेदी करण्यासाठी सज्ज व्हा, आज पुन्हा सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेटचे दर | Gold Price Down News Today

जेणेकरून संचमान्यतेमधील उच्चतम मान्य शिक्षक व शिक्षकेतर पदांपेक्षा अधिक पदाचे वेतन आहरित होणार नाही.

यासंदर्भात माध्यमिक शाळांमधील पोस्ट मॅींग कामकाज माहे जून वेतन पेड ईन जूलै २०२५ पूर्वी पूर्ण करावे. तसेच उच्च माध्यमिक (अनुदानित/अंशतः अनुदानित) शाळांच्या संचमान्यतेची शालार्थ प्रणालीवर नोंद करण्याची व या संचमान्यता PDF स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या उच्च माध्यमिक शाळांच्या संचमान्यता आधारे शालार्थ प्रणालीमध्ये संचमान्यतेमध्ये उच्चतम मान्य पदापेक्षा अधिक पदांचे वेतन आहरित होणार नाही यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.

करीता उच्च माध्यमिक शाळांचे जूलै वेतन पेड ईन ऑगस्ट २०२५ पूर्वी संचमान्यता पोस्ट मॅींग व संचमान्यता PDF स्वरूपात अपलोड करणे ही कार्यवाही पूर्ण करावी अन्यथा उपरोक्त प्रमाणे नमूद महिन्याचे वेतन शालार्थ प्रणालीवरून अदा करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

img 20250511 170900666867545674949878

Leave a Comment