State Employees Important Shasan Nirany:1)शासन निर्णय:नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या खुद आस्थापनेवरील व त्यांच्या अधिपत्या खालील आस्थापनेवरील अनुसचित जमाती प्रवर्गातून-नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या अथवा अन्य जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या गट “अ” “ब” “क” व गट “ड” या संवर्गातील कर्मचारी यांच्याकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत.
२)शासन निर्णय:वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील दिनांक ०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी/कर्मचारी दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांची पदभरतीची जाहिरात/अधिसूचना दि.०१.११.२००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे. त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) देणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई यांच्या कार्यालयातील, गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील श्रीमती अपेक्षा विलीन राणे, उच्चश्रेणी लघुलेखिका (इंग्रजी) यांचा अर्ज/विकल्प विहित मुदतीत शासनास प्राप्त झाला आहे.
२. सिटी सिव्हील कोर्ट, मुंबई यांचे मार्फत संदर्भ क्र.३ येथे नमूद दिनांक १०,०५.२००५ रोजी लिपिक-टंकलेखक या पदाच्या सरळसेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनुसरुन सिटी सिव्हील कोर्ट, मुंबई यांनी संदर्भ क्र.४ येथील दिनांक ०७.०७.२००६ रोजीच्या पत्रान्वये केलेल्या शिफारशीनुसार, श्रीमती अपेक्षा विलीन राणे (पूर्वाश्रमीच्या श्रीमती अपेक्षा चंद्रकांत सावंत), लिपिक-टंकलेखक गट-क. या पदावर नियुक्ती देण्यात आली होती.
०३. तद्नंतर सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्र.एएससी-१५०९/८१/प्र.क्र. १६/०९/१४-अ, दि.०४.११.२०१० रोजीचे पत्रान्वये, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचे मंत्रालयीन विभाग व बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयातील उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) पदावर नियुक्तीसाठी निवड परिक्षा-२००७ मध्ये आयोगाने श्रीमती अपेक्षा चंद्रकांत सावंत यांची प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई येथे उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) या पदावर नियुक्ती करण्यासाठी शिफारस केली होती. तद्नुसार, प्रिंसिपल जज, सिटी सिव्हील व सेशन कोर्ट, मुंबई यांचे कार्यालयीन आदेश क्र. ७६/२०१०, दि. ३०.११.२०१० अन्वये श्रीमती अपेक्षा चंद्रकांत सावंत यांना प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई येथे लघुलेखक (उच्चश्रेणी) या पदावर रुजू
होण्याकरिता दि. ३०.११.२०१० रोजीच्या आदेशान्वये कार्यमुक्त केले. तसेच प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई यांनी आदेश क्र.का.१/ससा/आस्था-१/अर्थसा/७५३८, दि.०१.१२.२०१० अन्वये श्रीमती अपेक्षा सावंत यांना दि. ०१/१२/२०१० रोजी (म.पू.) पासून लघुलेखक उच्चश्रेणी (इंग्रजी) या पदावर रुजू करुन घेतले.
वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील दिनांक ०२.०२.२०२४ व संदर्भ क्र.२ येथील दिनांक ०२.०५.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार श्रीमती अपेक्षा विलीन राणे, (पूर्वाश्रमीच्या श्रीमती अपेक्षा चंद्रकांत सावंत) उच्चश्रेणी लघुलेखिका (इंग्रजी) यांनी विहित कालावधीत म्हणजे दिनांक १३.०२.२०२४ रोजीच्या अर्जान्वये जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत विकल्प सादर केला.
श्रीमती राणे ह्या वित्त विभागाच्या शासन निर्णयात नमूद अटींची पूर्तता करीत असल्याने, त्यांना दिनांक १७.०७.२००६ ते दिनांक ३०.११.२०१० कालावधीतील सिटी सिव्हील कोर्ट, मुंबई येथील लिपिक-टंकलेखक पदावरील सेवा ही नंतरच्या दिनांक ०१.१२.२०१० पासूनच्या प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई येथील उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) या पदावरील सेवेस जोडून देण्यास संदर्भ क्र.५ येथील शासन आदेशान्वये मान्यता देण्यात आली आहे.
सबब, श्रीमती अपेक्षा विलिन राणे, उच्चश्रेणी लघुलेखिका (इंग्रजी) यांना वित्त विभा निर्णय, दिनांक ०२.०२.२०२४ मधील तरतूदीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) निय महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाध अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
3)शासन निर्णय:शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीचे विनियमन करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध करण्यासाठी तरतूद करण्याकरीता अधिनियम, २००५ अंमलात आला आहे.
या अधिनियमातील कलम-७ मध्ये मंत्रालयाचा प्रत्येक प्रशासनिक विभाग, आपल्या अधिकारिततेतील विभागप्रमुखांची आणि विभागांच्या प्रादेशिक कार्यालय प्रमुखांची यादी तयार करुन प्रकाशित करील आणि या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी आपल्या अधिकारितेतील बदल्या करण्यासाठी सक्षम असणारे प्राधिकारी अधिसूचित करील अशी तरतूद करण्यात आली आहे.
संदर्भ क्र.२ अन्वये, सदर अधिनियमातील कलम ६ मधील परंतुक २ व कलम-७ नुसार मत्स्यव्यवसाय विभागातील गट-अ व गट-ब संवर्गातील बदल्यांचे अधिकार प्रत्यार्पित करण्यात आले आहेत. आता गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास सक्षम प्राधिकारी घोषित करण्याची बाब विचाराधीन होती.
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा