SBI Home Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. आरबीआयने या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेचा टॅग सुद्धा दिलेला आहे.
आरबीआयने जारी केलेल्या देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादी एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या देशातील प्रमुख तीन बँकांचा समावेश होतो.
यामुळे अनेकजण एसबीआय कडून होम लोन घेण्याच्या तयारीत असतात. एसबीआय कडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे.
Ladki Bahin Yojana News : 5 लाख बहिणींना ₹1500 मिळणार नाही, तुमचे नाव आहे का चेक करा
SBI Home Loan
यामुळे जर तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घरासाठी गृह कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचा ऑप्शन बेस्ट राहणार आहे. दरम्यान, आता आपण एसबीआयच्या होम लोनची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहे एसबीआयचे होम लोन?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होम लोन बाबत बोलायचं झालं तर एसबीआय आपल्या ग्राहकांना सध्या स्थितीला आठ टक्के व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.
सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. ज्या लोकांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो त्यांचा सिबिल स्कोर चांगला मानला जातो. चांगला सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
अशा लोकांना बँकेकडून लवकर कर्ज मंजूर होते शिवाय कर्जाचा व्याजदर कमी राहतो. अशा व्यक्तींना मंजूर होणाऱ्या कर्जाची रक्कम सुद्धा इतरांपेक्षा अधिक राहते.
36 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा ईएमआय?
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून जर एखाद्या ग्राहकाला 36 लाख रुपयांचे होम लोन 15 वर्षांसाठी किमान 8% व्याजदरात मंजूर झाले तर अशा ग्राहकाला 34,403 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.
म्हणजेच या कालावधीत संबंधित ग्राहकाला मुद्दल आणि व्याज असे एकूण 61 लाख 92 हजार 540 रुपये द्यावे लागणार आहेत. अर्थातच 25 लाख 92 हजार 540 रुपये फक्त व्याज म्हणून बँकेला द्यावे लागतील.