NEET UG Hall Ticket 2025 Download:नीट यूजी 2025 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) कडून आयोजित NEET UG 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र 1 मे 2025 रोजी अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले जाईल.
विद्यार्थी हे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वरून डाउनलोड करू शकतील.
ही परीक्षा 4 मे 2025 रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घेतली जाईल. चला तर जाणून घेऊया परीक्षेचं स्वरूप कसे आहे आणि विध्यार्थ्यानी कशी तयारी केली पाहिजे.
परीक्षा पेन-पेपर मोडमध्ये
NEET UG 2025 ही परीक्षा 4 मे 2025 रविवार पेन-पेपर मोडमध्ये घेतली जाईल. संपूर्ण देशात 550 शहरांतील सुमारे 5000 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा एकाच दिवशी व एकाच सत्रात पार पडणार आहे. परीक्षेची वेळ दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल.
ICSE बोर्डाचा दहावीचा निकाल २०२५ जाहीर ! येथे पहा दहावीचा निकाल.ICSE Board 10th Result 2025 declared
परीक्षा पद्धत
NEET UG 2025 ही परीक्षा पूर्वीच्या पारंपरिक स्वरूपात घेतली जाणार आहे. पेपरमध्ये एकूण 180 बहुपर्यायी प्रश्न (MCQs) विचारले जातील. परीक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 तास (180 मिनिटे) दिले जातील.
आणि प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतील तर चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल म्हणजेच नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
प्रश्न कोणकोणत्या विषयांतून विचारले जातील?
एकूण प्रश्नपत्रिका 720 गुणांची असेलः
भौतिकशास्त्र (भौतिकशास्त्र): ४५ प्रश्न
रसायनशास्त्र (Chemistry) : 45 प्रश्न
जीवशास्त्र (जीवशास्त्र – झूलॉजी व बॉटनी): ९० प्रश्न