मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत New GR Ladki Bahin Yojana 11th Insttalment GR

Ladki Bahin Yojana 11th Insttalment GR:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत.

(१) महिला आणि बालविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक एमबावी-२०२४/पी.के.आर.९६/कार्य-२, दिनांक २८.०६.२०२४, दिनांक ०३.०७.२०२४, दिनांक १२.०७.२०२४ आणि दिनांक २५.०७.२०२४.

(२) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२५/प्र.क्र.४४/अर्थ-२, दि.०७.०४.२०२५.

(३) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय समक्रमांक दि.३०.०४.२०२५.

प्रस्तावना :-

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सदर योजनेंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील २१ ते ६५ या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (Direct Benefit Transfer) दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम देण्यात येते.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या मागणी क्र.एक्स-१, लेखाशिर्ष २२३५ डी६३१ अंतर्गत ३१-सहाय्यक अनुदान (वेतनेत्तर) या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या रु.२८२९०.०० कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतूदीमधून रु.२५११.०० कोटी (अक्षरी रु. दोन हजार पाचशे अकरा कोटी फक्त) इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (Direct Benefit Transfer) अदा करण्याच्या अनुषंगाने वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शासन निर्णय :-

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या मागणी क्र.एक्स-१, लेखाशिर्ष २२३५ डी६३१ अंतर्गत ३१-सहाय्यक अनुदान (वेतनेत्तर) या उद्दिष्टाखाली (सर्वसाधारण घटकांसाठी) रु.२८२९०.०० कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात आली आहे.

सदर अर्थसंकल्पीय तरतूदीमधून रु.२९८४.००.०० कोटी (अक्षरी रु. दोन हजार नऊशे चौरेऍशी कोटी फक्त) इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे.

भारतीय पोस्टात 21,413 जागांची GDS तिसरी मेरिट यादी 2025 जाहीर, तुमचे नाव यादीत पहा India Post GDS 3rd Merit List 2205

IMG 20250529 WA0003

 

Leave a Comment