DA Hike News:क्रमांक : भाप्रसे-१५२३/प्र.क्र.८३/२०२३/ भाप्रसे-३ सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- १५/०५/२०२५
केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय, निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभाग, नवी दिल्ली यांच्या क्रमांक ४२/०२/२०२४-P&PW (D) दिनांक ११/०४/२०२५ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक /कुटुंबनिवृत्ती वेतनधारक अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.
केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१/०१/२०२५ पासून लागू करण्यात आलेली २% महागाई भत्त्यातील (Dearness Relief) दरवाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना / कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांनाही लागू राहतील. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारकांना / कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना दिनांक ०१/०१/२०२५ पासून ५५% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.
सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०५१५१२०७०३७९०७ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अनुक्रमांक: भाप्रसे-१५२३/प्र.क्र.८३/२०२३/भाप्रसे-३ सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दिनांक :- १५/०५/२०२५
भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभागाच्या क्रमांक १/१ (१)/२०२५-E.-II (B), दि. ०२/०४/२०२५ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत, महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१/०१/२०२५ पासून लागू करण्यात आलेला २% वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि.०१/०१/२०२५ पासून ५५ % दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.
सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०५१५१२००४३५००७ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.
इतर बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,