तुमच्या नावावर किती SIM कार्ड ? चेक करा आणि खोटे नंबर बंद करा | Sanchar Saathi App Check SIM Card
आपल्या नावावर किती सिमकार्ड रजिस्टर्ड आहेत , जर आपल्या वापरातील सिमकार्ड नसेल तर दुरसंचार विभाग मार्फत लाँच करण्यात आलेल्या ॲप्सच्या माध्यमातुन सदर सिमकार्ड बंद करु शकता.
संचार साथी : भारतीय दुरसंचार विभाग मार्फत संचार साथी हे ॲप्स लाँच करण्यात आलेले आहेत , त्या ॲप्सच्या माध्यमातुन आपणांस आपल्या नावावर किती सिमकार्ड आहेत , ते पाहता येणार आहेत . तर जे सिमकार्ड आपण वापरत नसाल किंवा आपण न घेतलेले सिमकार्ड .
एका क्लिकवर डिलिट करु शकता . याकरीता आपणांस Play Store वरुन संचार साथी ( Sanchar Sathi ) हे ॲप्स डाऊनलोड करुन घ्यावे लागणार आहे . त्यांमध्ये आपणांस त्यांमध्ये आपणांस पाच प्रकारच्या सेवा पाहण्यास मिळतील ..
त्यापैकी आपल्या नावावर किती सिम आहेत , Know Mobile Connections in Your Name या ऑप्शनवर क्लिक करावे , त्यानंतर आपणांस आपल्या नावावर किती सिमकार्ड आहेत , ते दिसतील . त्यामध्ये जे नंबर आपल्या वापरात नसेल किंवा आपण घेतलेच नसेल अशा सिमकार्डवर क्लिक करुन Not My Number , Not Required या ऑप्शनवर क्लिक करावेत .
त्यानंतर ते सिमकार्ड आपल्या नावारुन कमी होईल , व जो कुणी सदर सिमकार्ड वापरत असेल , त्यांना परत व्हेरिफिकेशन करावे लागेल . ज्यामुळे सदर सिमकार्ड आपल्या नावावरुन वापरत असणाऱ्या व्यक्तीच्या नावे रजिस्टर्ड होईल .
याशिवाय आपणांस सिम हरविले किंवा चोरी झाल्यास ब्लॉक करण्याचा ऑप्शन मिळतो . याशिवाय आंतरराष्ट्रीय इनकमिंग कॉलसला रिपोर्ट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे .