१)शासन निर्णय:-वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी (आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व सह सचिव / उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई) यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय –
सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे.
2)राज्य शुध्दीपत्रकः-
उक्त संदर्भाधीन शासन निर्णय दि ३०,०४,२०२५ मधील परिच्छेद क्र. ०५ येचोलविभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई व बृहन्मुंबई महानगरपालिका या जिल्हा परिषदा नसलेल्या कार्यालयांतर्गत विशेष शिक्षकांचे लगतच्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेतर्गत तालुक्यातील रिक्त केंद्रावर समायोजन करुन त्यांच्या सेवा सध्या ते कार्यरत आहेत त्या केंद्रावर उपयोजित करण्यात याव्यात. यासाठी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी.” या ऐवजी विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई व बृहन्मुंबई महानगरपालिका या जिल्हा परिषदा नसलेल्या कार्यालयांतर्गत विशेष शिक्षकांचे समायोजन त्यांच्या पसंतीनुसार ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेतर्गत तालुक्यातील रिक्त केंद्रावर समायोजन करुन त्यांच्या सेवा सध्या ते कार्यरत आहेत त्या केंद्रावर उपयोजित करण्यात याव्यात. यासाठी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी ठाणे, पालघर व रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकान्यांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी, अशी समायोजनाची कार्यवाही खालील अटींच्या आधारे करण्यात यावे.
१) समायोजित करण्यात येणाऱ्या उमेदवारांकडून त्यांचे पसंतीनुसार उक्त नमूद तीन जिल्ह्यांकरीता प्राधान्यक्रम घेण्यात यावेत,
२) सदरच्या उमेदवारांची योजनेमधील नियुक्तीच्या दिनांकाच्या आधारे सेवाज्येष्ठ असणाऱ्या उमेदवाराला समायोजनाकरीता प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
३) प्राधान्यक्रम दिल्यानंतर एखाद्या जिल्ह्यामध्ये समायोजन करावयाच्या उमेदवारांपेक्षा उपलब्ध पदांची संख्या कमी असल्यास त्यांचा यथास्थिती दूसरा व तिसरा प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावा. ” असे वाचण्यात यावे.
०२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०५२८१७००३४४६२१ असा आहे. हे शासन शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन निर्णय येथे डाउनलोड करा