School Time Table And Holiday List:शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होताच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मराठी, कन्नड व उर्दू माध्यमांच्या शाळेसाठी सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकूण विद्यार्थ्यांना ७६ सुट्या मिळणार असून यात उन्हाळी व दिवाळीचा समावेश आहे.
दरम्यान, सुट्या जाहीर करताना वर्षभर काय काय करायचे, याबाबतच्या सूचना शाळांना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शाळेत कोणताही कार्यक्रम करीत असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करावे, जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळांची वेळ सकाळी १०:३० ते ५ अशी असणार आहे.
शाळेच्या कामकाजाच्या दिवशी ६० मिनिटांची मोठी व १० मिनिटांच्या लहान दोन सुट्या असणार आहेत. प्राथमिक शाळा सलग तीन दिवस बंद राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, सुटीच्या यादीतील सुट्या सोडून इतर दिवशी थोर नेत्यांची जयंती,
पुण्यतिथीनिमित्त शाळेस सुटी न घेता त्या दिवशी शाळा पूर्ण भरविण्यात यावी, हा दिवस वक्तृत्व, निबंधलेखन स्पर्धा घेऊन साजरा करावा, प्रत्येक शाळेत झालेल्या कार्यक्रमाचा एकत्रित केंद्राचा अहवाल केंद्र प्रमुखामार्फत गटशिक्षणाधिकारी कार्यालयास फोटोसह सादर करावा व
सुटी घेण्यापूर्वी वरिष्ठांना कळविणे आवश्यक
मुख्याध्यापक अधिकार सुट्टी घेण्यापूर्वी संबंधित
राज्यातील शाळांना शिक्षण विभागाकडून सुट्ट्यांची यादी जाहीर | Maharashtra School Holiday List 2025
मुख्याध्यापकांनी
गटशिक्षणाधिकारी पं. स. यांच्याकडे तीन दिवस अगोदर लेखी कळवावे, मार्च महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता शाळा भरविण्याबाबत शिक्षण समितीच्या निर्णयानुसार कळविण्यात येतील, उन्हाळ्याच्या सुटीनंतर प्राथमिक शाळा १५ जून २०२६ पासून सुरू होतील, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याची कडक अंमलबजावणी होणार असून, परिस्थितीनुसार यात बदल होऊ शकतो.
कादर शेख, शिक्षणाधिकारी
देण्यात यावी, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करावा, अशा सूचना देण्यात
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा