SBI Loan:- कमी सिबिल स्कोअर असूनही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून वैयक्तिक कर्ज घेणे अशक्य वाटत असले, तरी प्रत्यक्षात हे शक्य आहे. आजच्या आर्थिक जगात अनेक वेळा अचानक खर्च उद्भवतात जसे की,वैद्यकीय गरज, घरगुती दुरुस्ती, शिक्षण किंवा कौटुंबिक कार्यक्रम आणि अशावेळी वैयक्तिक कर्ज अत्यंत उपयुक्त ठरते. मात्र, कमी सिबिल स्कोअर हा एक अडथळा ठरतो.
सिबिल स्कोअर हा तुमच्या आर्थिक शिस्तीचा आणि कर्ज फेडण्याच्या क्षमतेचा मापक असतो. हा स्कोअर ३०० ते ९०० दरम्यान असतो आणि ७५० पेक्षा जास्त स्कोअर चांगला समजला जातो. परंतु, जर तुमचा स्कोअर ६०० पेक्षा कमी असेल, तर अनेक बँका तुमचं कर्ज अर्ज नाकारतात. अशावेळी SBI सारख्या मोठ्या बँका काही विशिष्ट निकषांवर आधारित कर्ज देतात आणि यातून तुम्ही फायदाही मिळवू शकता.
SBI कर्ज मिळवण्याचे सोपे मार्ग
अर्जदाराचे उत्पन्न
सर्वप्रथम, SBI कर्ज देताना अर्जदाराचे उत्पन्न किती स्थिर आहे हे पाहते. जर तुमच्याकडे नियमित पगाराची नोकरी असेल किंवा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल आणि आर्थिक घसारा नफा दाखवणारा असेल, तर SBI तुम्हाला कमी सिबिल स्कोअर असूनही वैयक्तिक कर्ज मंजूर करू शकते. यासाठी पगाराच्या स्लिप्स, बँक स्टेटमेंट्स, आयकर विवरणपत्रे ही कागदपत्रे आवश्यक असतात. उत्पन्नाची खात्री बँकेला EMI फेडण्याच्या क्षमतेवर विश्वास देऊ शकते.
कमी रकमेच्या कर्जासाठी अर्ज करणे
दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे कमी रकमेच्या कर्जासाठी अर्ज करणे. जर तुम्हाला तात्काळ पाच लाख रुपयांची गरज असेल, तरी तुमचा स्कोअर पाहता सुरुवात १-२ लाखांच्या कर्जाने करावी. बँकेला यामध्ये कमी धोका वाटतो आणि कर्ज मिळण्याची शक्यता अधिक असते. हे कर्ज वेळेवर फेडल्यास तुमचा सिबिल स्कोअर हळूहळू सुधारतो, आणि भविष्यात मोठ्या रकमेचे कर्ज घेणे सोपे होते.
सह-अर्जदार किंवा हमीदार घेणे
तिसरा पर्याय म्हणजे सह-अर्जदार किंवा हमीदार घेणे. जर तुमचा सिबिल स्कोअर अत्यंत कमी असेल, तर चांगल्या स्कोअर असलेला सह-अर्जदार (co-applicant) जोडल्यास बँकेला तुमच्यावर विश्वास ठेवायला मदत होते. हा व्यक्ती तुमचा जवळचा नातेवाईक किंवा मित्र असू शकतो. सह-अर्जदारामुळे बँकेची जोखीम कमी होतो आणि कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते.
सुरक्षित कर्जासाठी अर्ज करणे
चौथा मार्ग म्हणजे सुरक्षित कर्जासाठी अर्ज करणे. सामान्यत: वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित स्वरूपाचे असते, पण कमी क्रेडिट स्कोअर असताना, SBI तुम्हाला मुदत ठेव (Fixed Deposit), सोनं किंवा मालमत्तेवर आधारित सुरक्षित कर्ज देऊ शकते. अशा सुरक्षित कर्जात तारण दिल्यामुळे बँकेला हमी मिळते आणि तुमचा सिबिल स्कोअर कमी असूनही कर्ज मिळू शकते. SBI मधील ‘लोन अगेंस्ट एफडी’ हे एक चांगले उदाहरण आहे, जिथे कमीतकमी व्याजदरात आणि कमी दस्तऐवजीकरणात कर्ज मिळते.
चालू SBI खात्याचा फायदा
पाचवे आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे तुमच्या चालू SBI खात्याचा फायदा घेणे. जर तुमचे पगार खाते किंवा बचत खाते SBI मध्ये असेल, तर बँक तुमच्यासाठी पूर्व-मंजूर कर्ज (Pre-Approved Loan) देऊ शकते. यामध्ये सिबिल स्कोअरची पडताळणी तुलनेने कमी असते आणि प्रक्रिया जलद होते. तुम्ही YONO अॅपवरून किंवा ‘PAPL <space> खाते क्रमांकाचे शेवटचे ४ आकडे’ असा एसएमएस 567676 वर पाठवून तुमची पात्रता तपासू शकता.
एकंदरीत पाहता सिबिल स्कोअर सुधारण्यावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जर तात्काळ कर्ज आवश्यक नसेल, तर काही महिन्यांत स्कोअर सुधारण्यासाठी प्रयत्न करा. क्रेडिट कार्डची देणी वेळेवर भरा, कर्जाच्या हप्त्यांमध्ये उशीर करू नका, आणि क्रेडिट युटिलायझेशन ३०% पेक्षा कमी ठेवा. क्रेडिट ब्युरोच्या रिपोर्टमध्ये एखादी चूक असल्यास, ती दुरुस्त करणे देखील महत्त्वाचे आहे.