थकित वेतन अदा करणेबाबत, शासन निर्णय निर्गमित दि.27.06.2025 | Salary arrears

Salary arrears:अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करणेबाबत.

१) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.२४.०३.२०२५ रोजीचे पत्र

२) वित्त विभागाचे क्र. अर्थसं २०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३. दि.०७.०४.२०२५ चे परिपत्रक

प्रस्तावना :-अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत सुनावणीअंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन अदा करण्यासाठी मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्र.७६५/२०२४ दाखल केली आहे.

रिट याचिका क्र.१०३०/२०१६ मध्ये दि.२५.०८.२०१६ व अवमान याचिका क्र.२६४/२०१७ मध्ये दि.०१.०७.२०२२ रोजी मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा संदर्भ देऊन सुनावणीअंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांना केलेल्या कामाचे वेतन देण्याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई आणि खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे नव्याने मोठ्या प्रमाणात याचिका दाखल होत आहेत.

लाडकी बहीण योजना : जून ₹1500 चा हप्ता या तारखेला जमा होणार, तारीख फिक्स ! यादीत नाव पहा Ladki Bahin Yojana Insttalment Update

त्यानुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्र.७६५/२०२४ मधील विशेष शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर, २०२३ पर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी एकूण रु.१६,२४,८३१/- इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका ७६५/२०२४ मधील विशेष शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर, २०२३ पर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी रु.१६,२४,८३१/- (अक्षरी रु. सोळा लक्ष चोवीस हजार आठशे एकतीस फक्त) इतका निधी उपलब्ध करवून देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. थकित वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी, याबाबत कोणतीहो अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल. सदर चकीत वेतनाच्या रकमेची अनुज्ञेयता व परिगणना शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे. उपरोक्तनुसार वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा. शिल्लक निधीचा विनियोग करण्यापुर्वी शासनाची पूर्वमान्यता घेण्यात यावी. वितरीत करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे.

३. सदर खर्च “मागणी क्र. ई-२, २२०२ सर्वसाधारण शिक्षण, ०१ प्राथमिक शिक्षण, १०६-शिक्षक व इतर सेवा, (००) (००) (०१) समग्र शिक्षा अभियान (सर्वसाधारण) (राज्य हिस्सा ४० टक्के) (२२०२ आय ६१२) (कार्यक्रम), ३१-सहायक अनुदाने (वेतनेतर)” या लेखाशिर्षाखाली सन २०२५-२६ या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा.

10वी/ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी! महाराष्ट्र शासनाच्या विभागात 154 सरकारी जागांसाठी भरती DTP Maharashtra Recruitment 2025

४. सदर निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेकडे सुपूर्त करण्यात येत आहे. सदर निधी आहरीत करून वितरीत करण्यासाठी अवर सचिव/ कक्ष अधिकारी (रोख शाखा/ लेखा शाखा), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “आहरण व संवितरण अधिकारी” तर सह सचिव/उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहरीत करुन समग्र शिक्षा योजनेच्या SNA खात्यात जमा करावा. सदर निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कडे सुपूर्त करावा.

५. वित्त विभाग, शासन परिपत्रक दि.०७.०४.२०२५ मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे. सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरिताच्या अटी व शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत.

शाळेची वेळ साडेदहा ते पाच; ६० मिनिटांची मोठी सुटी! दिवाळी आणि उन्हाळी सुट्टी एवढ्या दिवस असणार | School Time Table And Holiday List

६. सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र. ३२१/१४७१, दि.०३.०६.२०२५ व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र.७०४/व्यय-५, दि.१७.०६.२०२५ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०६२७१५१६४७२५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील सुट्टयांची यादी जाहीर ; परिपत्रक निर्गमित दि.27.06.2025 | School Holiday List 2025

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

img 20250628 0747567891129880108226659

Leave a Comment