20 वा हप्ता ₹2000 येण्यापूर्वी PM Kisan योजनेत 6 मोठे बदल! पहा सविस्तर PM Kisan Yojana New 6 Rule

PM Kisan Yojana New 6 Rule:पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू असून, अद्याप याबाबत केंद्र सरकारने कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. मात्र हा हप्ता 31 जुलै 2025 पर्यंत कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो.

त्याआधीच सरकारने पीएम किसान पोर्टलवर 6 महत्त्वाचे बदल केले आहेत, जे थेट शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत. चला पाहूया काय आहेत हे बदल आणि त्याचा काय होणार आहे फायदा:

मोबाईल नंबर अपडेट करता येणार

शेतकरी आता पोर्टलवरून स्वतःचा मोबाईल नंबर अपडेट करू शकतात. यासाठी ‘Update Mobile Number’ या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबरद्वारे नवीन मोबाईल नंबर नोंदवता येईल.

ऑनलाइन परतावा (Refund) सुविधा

जर एखाद्या अपात्र शेतकऱ्याने चुकून योजना अंतर्गत पैसे घेतले असतील, तर तो आता ते पैसे ऑनलाईन परत करू शकतो. ‘Refund’ या पर्यायाद्वारे आधार क्रमांक टाकून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येईल.

स्वेच्छेने लाभ सोडण्याचा पर्याय

योजना अंतर्गत लाभ घेण्याची गरज नसेल, तर ‘Voluntary Surrender of PM-KISAN Benefits’ पर्याय वापरून लाभ सोडता येतो. रजिस्ट्रेशन नंबर टाकून संमती द्यावी लागेल, ओटीपीद्वारे पुष्टी करून प्रक्रिया पूर्ण करता येईल.

बँक ऑफ महाराष्ट्र होम लोन 30 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे, ऑनलाइन अर्ज कसा करावा…….!Bank of Maharashtra Home loan

चुकून लाभ सोडल्यास पुन्हा सुरु करण्याची संधी

कधी कधी लाभार्थी चुकून ‘Voluntary Surrender’ करतात. अशा वेळी, ‘Voluntary Surrender Revocation’ या नवीन पर्यायाद्वारे पुन्हा नोंदणी करता येते. यासाठी आधार किंवा रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक असेल.

PM Kisan योजनेच्या 2000 रुपये 20व्या हप्त्याची तारीख आणि वेळ जाहीर

राज्य अथवा जिल्हा बदलता येणार

‘State Transfer Request’ या सुविधेमुळे शेतकरी आपला राज्य किंवा जिल्हा अपडेट करू शकतात. हे बदल फक्त जमीनधारक दस्तऐवज (उदा. 7/12 उतारा) अपलोड केल्यानंतरच मान्य होतील. जर एखादी रक्कम वितरण प्रक्रियेत असेल, तर ती पूर्ण झाल्यावरच पत्ता बदलता येईल.

हेल्पडेस्क क्वेरी फॉर्म

शेतकऱ्यांना जर हप्ता न मिळाल्यास किंवा तांत्रिक अडचण असल्यास, ‘Helpdesk Query Form’ भरून थेट पीएम किसान पोर्टलवर तक्रार नोंदवता येईल.

या नव्या 6 सुविधांमुळे शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक, सुलभ व तांत्रिकदृष्ट्या सशक्त सेवा मिळणार आहेत. जेणेकरून कोणतीही अडचण येवू न देता पीएम किसान योजनेचा लाभ सहज मिळवता येईल.

जर तुम्हाला यापैकी कोणत्याही सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर PM-KISAN पोर्टल ला भेट द्या.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment