मुंबई पोलीस शिपाई 2022-2023 अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना वैद्यकिय चाचणीसह नियुक्ती आदेश देणेबाबत | Mumbai Police Constable Final Selection List

Mumbai Police Constable Final Selection List:मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नेमणूकीबाबत.

संदर्भ जा.क्र.पोआ/कक्ष-१ (पोभ)/९(१)/३३३/२०२५, दि.१७/०२/२०२५.

उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतरिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहून गुणवत्तेनुसार प्रसिध्द करण्यात आली आहे.

चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रांची पडताळणीच्या अधीन राहून आणि वैद्यकिय चाचणी घेण्यात येत असून जे उमेदवार वैद्यकिय चाचणीत पात्र ठरतील अशा उमेदवारांना दिनांक २०/०५/२०२५ रोजी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहेत.

सोबतच्या यादीत नमूद केलेल्या ५४ उमेदवारांनी दिनांक २०/०५/२०२५ रोजी वैद्यकिय चाचणी तथा नियुक्ती आदेश स्विकारण्यासाठी प्रशिक्षाणास जाण्याच्या तयारीनीशी सशस्त्र पोलीस, कोळे कल्याण प्रशिक्षण व क्रिडा, कलीना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई येथे सकाळी ०७:०० वाजता हजर रहावे.

सदर दिवशी जर उमेदवार नियुक्ती आदेश स्विकारण्यासाठी गैरहजर राहिले तर सदर गैरहजर उमेदवारांस मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्त होण्याचे स्वारस्य नाही असे गृहित धरुन त्याची अंतरिम निवड यादीतून निवड कायमस्वरुपी रह करण्यात येईल, तसेच त्यांच्या जागी अंतरिम प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीसाठी संधी देण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

उमेदवारांना नियुक्ती पत्र स्विकारण्याकरिता बोलाविण्यात आले म्हणून नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. भरती प्रक्रीयेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठराल्यास निवड रह करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास आहेत, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच खाली नमूद केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे.

HDFC बँकेकडून 30 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतल्यास, इतका द्यावा लागेल हप्ता [EMI] | HDFC Bank Home Loan EMI

नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणावयाच्या आवश्यक बाबी :-

१) भरती ओळखपत्र (मैदानी चाचणी / लेखी परिक्षेचे)

२) ०४ पासपोर्ट साईज फोटो.

३) आधार कार्ड व पैन कार्ड.

४) दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर रहावे.

५) आवेदन अर्जामध्ये नमूद केलेली मूळ कागदपत्रे (सामाजिक/समांतर आरक्षण सिध्द करण्यास सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेली प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हता, अधिवास प्रमाणपत्र/रहिवास दाखला, एम.एस.सी. आय.टी. व इतर)

६) शासनाने वेळोवेळी विहीत केलेले लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी, नियुक्ती पुर्वीचे हमीपत्र, जन्म तारखेचे हमीपत्र नमुना सोबत जोडला असून तो सुवाच्छ स्वाक्षरात सोबत भरुन आणावेत.

सोबत नियमीत वापरण्यास लागणारे कपडे, विश्रांतीकरिता साहित्य (दरी, मच्छरदाणी, पांघरुण), ताट-वाटी, तांब्या, ग्लास, दाडीचे साहित्य (पुरुषांकरिता), २ खाको हाफ पॅन्ट, २ पांढऱ्या बनियान, कॅनव्हास शुज (१ जोडी), खाको नायलॉन सॉक्स (२ जोडी), २०० पानी वह्या (२), १ पेन, गांधी टोपी, १ लोखंडी बकेट, २ ट्राऊझर (महिलांकरिता), २ पांढरे टी-शर्ट इ. साहित्य सोबत आणावे. सोबत “मेस अॅडव्हान्स १. २,०००/- घेऊन यावे.”

तसेच संपकर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत ठेवावा, उमेदवाराने आपल्यासोबत चैनीच्या वस्तू किंवा किंमती वस्तू उदा. सोन्याचे दागिने इ. वस्तू आणू नयेत. अशा वस्तू हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.

विशेष सुचना :-

१. भरती आवेदन पत्र नसल्यास अथवा अपूर्ण कागदपत्रे/प्रमाणपत्रे असल्यास नियुक्ती देण्यात येणार नाही. नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्यावेळी गैरहजर राहिल्यास पूर्व सूचना न देता निवड रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व न चुकता हजर रहावे.

सदरची पोलीस शिपाई पदाची अस्थायी नियुक्ती ही नियुक्ती आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन आहे व सदरहू अटी व शर्ती उमेदवारांस बंधनकारक आहेत.

२. नियुक्तीसाठी बोलविण्यात आलेल्या उमेदवाराने भरती निकषांची/अर्हतेची पूर्तता न केल्याचे आढळून आल्यास नियुक्ती दिली जाणार नाही, अथवा नियुक्तीनंतर पात्रते विषयी त्रुटी आढळून आल्यास उमेदवाराची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

IMG 20250517 WA00201

Leave a Comment