राज्यातील शाळांना शिक्षण विभागाकडून सुट्ट्यांची यादी जाहीर | Maharashtra School Holiday List 2025

Maharashtra School Holiday List 2025:१५ जूनपासूनच राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत.

यानंतर आता विद्यार्थ्यांना वर्षभरात किती आणि कधी सुट्टी असणार याची यादी महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून प्रकाशित करण्यात आली आहे.

त्यानुसार वर्षभरात राज्यातील शाळांना १२८ दिवस सुट्ट्या असतील, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

यात ५२ रविवार आणि ७६ इतर सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यात दिवाळीच्या सुट्ट्या दहा दिवस म्हणजेच (१६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत) असणार आहे.

11th Admission 11 वी ऍडमिशन प्रथम मेरिट यादी दि. 30/06/2025 ला घोषित होणार! शासन निर्णय | 11th Admission Merit List 2025

तर उन्हाळ्याच्या ३८ दिवस सुट्ट्या असणार आहे. (२ मे ते १३ जून २०२६) पर्यंत या सुट्ट्या असणार आहेत.

जिल्हा परिषदेची शाळा सकाळी साडेदहा वाता भरणार आहे आणि संध्याकाळी ५ वाजता सुटणार आहे. तर अर्धवेळीची शाळा नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे.

शाळेच्या दिवशी ६० मिनिटांची सुट्टी असणार आहे. तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात १०-१० मिनिटांच्या दोन सुट्ट्या असणार आहे.

वर्षभरातील सुट्ट्या

जुलै : आषाढी एकदशी, मोहरम, नागपंचमी

ऑगस्ट : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी

वनविभागात एकूण 12,991 पदांची भरती लवकरच; वेतन ₹15,000 – ₹47,600 पर्यंत | Maharashtra Forest Recruitment 2025

सप्टेंबर : गौरी विसर्जन, ईद-ए- मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना

ऑक्टोबर : गांधी जयंती आणि दिवाळीची सुट्टी

नोव्हेंबर : गुरूनानक जयंती

डिसेंबर : ख्रिसमस- नाताळ

जानेवारी : मकरसंक्रांती, शबे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन

फेब्रुवारी : शब-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती

मार्च : धुलिवंदन, रंगपंचमी, शब-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती

एप्रिल : गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

मे : महाराष्ट्र दिन, उन्हाळा सुट्टी

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment