वनविभागात एकूण 12,991 पदांची भरती लवकरच; वेतन ₹15,000 – ₹47,600 पर्यंत | Maharashtra Forest Recruitment 2025

Maharashtra Forest Recruitment 2025:विषय: वन व्यवस्थापनामध्ये वनमजुर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग महाराष्ट्र वन विभाग सध्या वैधानिक वनक्षेत्रासह, वनेत्तर क्षेत्रातील वने आणि वन्यजीव याचे व्यवस्थापन करीत आहे. राज्याचे ६१९०७ चौ. कि.मी. वनक्षेत्र हे राज्यातील विविध गावात व त्याच्या लगतच्या क्षेत्रात विखुरलेले आहे. सदर वनक्षेत्रांच्या प्रशासकीय व्यवस्थापनासाठी ११ प्रादेशिक वृत्ते आहेत. तसेच राज्यात ४७ प्रादेशिक वनविभाग व १५ वन्यजीव विभाग असे एकूण ६२ वनविभाग आहेत. त्या अंतर्गत ३७५ प्रादेशिक परिक्षेत्रे व ९९ वन्यजीव परिक्षेत्र व २८८ सामाजिक वनीकरण परिक्षेत्र असे एकूण ७६२ परिक्षेत्र कार्यालये आहे. परिक्षेत्रांतर्गत १४८० प्रादेशिक व ३०४ वन्यजीव असे एकूण १७८४ परिमंडळ व त्याअंतर्गत ५५५९ प्रादेशिक व १०९२ वन्यजीव असे एकूण ६६५१ नियतक्षेत्र आहेत. नियतक्षेत्रात येणा-या वनक्षेत्राच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी ही वनरक्षकाकडे आहे. एका वनरक्षकाकडे सर्वसाधारणपणे ९ चौ.कि.मी. वनक्षेत्र + ४७ चौ. कि.मी. भौगोलिक क्षेत्र येते. वरील शाखाव्यतिरिक्त वनविभागात कार्य आयोजना, संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण या शाखा आहेत.

२. वनविभागात वनसंवर्धन, संरक्षण व विकासाची कामे निरनिराळ्या योजनाअंतर्गत राबविली जातात. सदर कामे ही श्रमाभिमुख असून दर वर्षी ग्रामीण व दुर्गम भागात अकुशल मजूरांमार्फत मंजूर असलेली विविध कामे ठराविक कालावधीसाठी राबविण्यात येतात. मजूरांना विविध योजनेंतर्गत मजूरीपोटी मंजूर मजुरीदराप्रमाणे उपलब्ध अनुदानातून देण्यात येते.

3. कायम (अधिसंख्य) मजुरांची पध्दत सन १९९६ पूर्वी अस्तित्वात नव्हती. तथापी वनविभाग वर्षानुवर्ष कामावरील रोजंदारी मजूरांचा प्रदीर्घ कालावधी विचारात घेऊन वनविभागामध्ये योजनांतर्गत / योजनेत्तर कामामध्ये सलग कार्यरत असलेल्या ज्या रोजंदारी मजूरांनी दि. १/११/१९९४ रोजी ५ वर्षाची सलग सेवा पूर्ण केलेली आहे अशा ८०३८ मजूरांना दिनांक १/११/१९९४ पासून अधिसंख्य पदावर कायम करणेबाबत शासनाने दिनांक ३१/१/१९९६ चे शासन निर्णयान्वये निर्णय घेतला. पाच वर्षाच्या सलग सेवेचा कालावधीची गणना करताना वनविभागातील योजनांतर्गत / योजनेत्तर कामामध्ये रोजंदारी मजूरांनी प्रत्येक वर्षांत कमीत कमी २४० दिवस काम केले असावे, अशी त्यामध्ये अट होती. याकरीता

(ब) यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल. स्थानिक याचा अर्थ ज्या वनविभागात नियुक्ती द्यावयाची आहे त्या वनविभागातील (Division) रहिवासी असा राहील.

(क) सदर पद गट-ड मधील राहील व त्याची सातव्या वेतन आयोगात वेतनश्रेणी एस-१ (रु. १५०००-४७६००) अशी राहील.

(ड) सदर पदाचे पदनाम वनसेवक असे राहील.

(इ) सदर पदावर नियुक्तीकरीता किमान १० वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल. तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही १२ वी असावी, कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसलेबाबत हमीपत्र उमेदवाराकडून लिहून घेण्यात यावे.) कमाल मर्यादा १२ वी पास न ठेवलेस उच्चशिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणारे उमेदवारांना संधी मिळणार नाही.

(फ) वनसेवक पदावर नियुक्ती करताना वनविभागात सद्या कार्यरत रोजंदारी मजूरांना वयामध्ये (५५ वर्षापर्यंत) सुट देऊन त्यांना १०% आरक्षण देण्यात यावे. वनसेवक पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाचा फायदा मिळणेकरीता रोजंदारी मजूर म्हणजे “मजूराने प्रतिवर्ष किमान १८० दिवस तुटक तुटकरित्या किमान कोणतेही ५ वर्ष काम केले असावे अशी अट राहील. परंतू रोजंदारी मजूरांनी त्यांच्या रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण दाखल केले असल्यास व ते प्रलंबित असल्यास वनसेवक म्हणून नियुक्तीपूर्वी असे प्रकरण परत घेतल्यानंतरच वनसेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी.

(ग) वनरक्षक (गट-क) मधील २५% पदे ही वनसेवकांमधून पदोन्नतीने भरण्यात येतील.

१९. वनविभागात सद्या असलेले वनमजूर हे खालीलप्रमाणे कामे करीतच आहेत. त्या आधारे वनसेवकांच्या प्रस्तावित कर्तव्य व जबाबदा-या खालीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे.

(१) नियतक्षेत्र वनसेवक (वनरक्षकाचे मदतनीस) प्रत्येक नियतक्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्यक म्हणून काम करणे. यामध्ये नियतक्षेत्रात गस्त करुन वनाचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वनगुन्हा नोंदविणेसाठी सहाय्य करणे / तपासात सहाय्य करणे, प्रलचित नियमाप्रमाणे वनक्षेत्राच्या सिमांची देखभाल करणे, वन वनव्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामे, JMFC / VEDC इत्यादीसंदर्भात कामे, कार्य आयोजनेचे अनुषंगाने कामे, मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळणेसाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी सहाय्य करणे, Rescue Operation ची कामात सहाय्य करणे, रोहयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे. याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे

(२) परिमंडळ वनसेवक (क्षेत्र सहाय्यकाचे मदतनीस) प्रत्येक परिमंडळासाठी क्षेत्र सहाय्यकास सहाय्यक म्हणून काम करणे. यामध्ये परिमंडळात गस्त करुन वनाचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वनगुन्हा नोंदविणेसाठी सहाय्य करणे / तपासात सहाय्य करणे, प्रलचित नियमाप्रमाणे वनक्षेत्राच्या सिमांची देखभाल करणे, वन वनव्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामे, JMFC / VEDC इत्यादीसंदर्भात कामे, कार्य आयोजनेचे अनुषंगाने कामे, मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळणेसाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी सहाय्य करणे, Rescue Operation ची कामात सहाय्य करणे, रोहयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनपालास सहाय्य करणे. याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

(३) वन परिक्षेत्र कार्यालयीन मदतनीस वन परिक्षेत्र कार्यालयात शासनाच्या विविध योजना व संरक्षण संवर्धनाशी निगडीत विविध कार्यालयीन कामे पार पाडण्यासाठी सहाय्यक म्हणून काम करणे. याशिवाय वन परिक्षेत्र अधिका-यासोबत गस्त करणे तसेच अतिक्रमण काढण्याच्या घटना, सॉमिल तपासणी, मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना व त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था राखणे याकामी वन परिक्षेत्र अधिका-यांना सहाय्यक म्हणून काम करणे. तसेच वनसेवकास वन परिक्षेत्र अधिका-यानी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे

(४) संरक्षण पथक मदतनीस वनविभागातील प्रत्येक संरक्षण पथक / फिरते पथक मध्ये मदतनीस म्हणून काम करणे. याशिवाय वन परिक्षेत्र अधिका-यासोबत गस्त करणे तसेच अतिक्रमण काढण्याच्या घटना, सॉमिल तपासणी, मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना व त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था राखणे याकामी वन परिक्षेत्र अधिका-यांना सहाय्यक म्हणून काम करणे. वन परिक्षेत्र अधिकारी, संरक्षण पथक / फिरते पथक यांनी वनसेवकास वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

(५) शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी मदतनीस वनविभागाचे प्रत्येक शासकीय कार्यालय / कार्यशाळा / आगार / वनविश्रामगृहे वनोज्ञान /जिल्हास्तरीय व उच्च पदस्थ अधिका-याचे निवासस्थान ही शासकीय मालमत्ता असल्याने त्याची देखरेख व इतर कामे करणे

(६) तपासणी नाका मदतनीस तपासणी नाक्यावर सहाय्यक म्हणून काम करणे

(७) एकीकृत रोपवाटीका (Integrated Nursery) मजूर: रोपवाटीका मजूर म्हणून काम करणे. यामध्ये रोपवाटीकेची संपूर्ण देखरेख करणे, साफसफाई करणे, पाणी देणे, बियाणे गोळा करणे, रोपवाटिकेच्या कुंपणाची किरकोळ दुरुस्तीची कामे करणे इत्यादी कामांचा समावेश राहील. याशिवाय वरिष्ठांनी रोपवाटीकेसंदर्भात वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे

अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा 

(८) इतर : वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली इतर शासकीय कामे

२०. वनविभागात सद्या अधिसंख्य मजूर किती कार्यरत आहे व अधिकच्या किती मजूरांची आवश्यकता आहे याबाबत क्षेत्रीय स्तरावरुन माहिती मागविण्यात आली होती. त्याचा वनवृत्तनिहाय व वनविभागनिहाय तपशील यासोबत जोडला आहे. (परिशिष्ट-३)

२१. प्राप्त माहितीनुसार सद्यास्थितीत ४५४५ अधिसंख्य मजूर कार्यरत आहेत. तसेच वनवृत्ताकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना ८४४६ अधिकच्या मजूरांची आवश्यकता आहे. परंतू ४५४५ अधिसंख्य मजूरांची पदे वेळेनुसार निरसित होणार असल्याने वनविभागास एकूण (४५४५+८४४६) १२९९१ नियमित वनसेवक (गट-ड) पदांची आवश्यकता आहे. त्याकरीता खालीलप्रमाणे खर्च अपेक्षित आहे.

(१) एका वनसेवकाची वेतनश्रेणी: एस-१ (रु. १५०००-४७६००)

(२) मुळ वेतन: रु. १५०००/-

(३) महागाई भत्ता (४६%):- रु. ६९००/-

(४) घरभाडे भत्ता (१८% किंवा किमान ३६००/-):- रु. ३६००/-

(५) स्थानिक पुरक भत्ता :- रु. ९०/-

(६) वाहतूक भत्ता: रु. १०००/-

(७) स्थापना प्रवासभत्ता. (वनरक्षपोर्टी.इन १५००/-

एकूण :- २८०९०

२२. अशा प्रकारे एका वनसेवकास १२ महिन्याकरीता रु. ३,३७,०८०/- इतका खर्च येणार आहे. त्यानुसार १२९९१ वनसेवकांचे पदा‌करीता वर्षाचा खर्च रु. ४,३७,९०,०६,२८०/- (४३७.९० कोटी) इतका वार्षिक खर्च अपेक्षित आहे.

२३. वनविभागावर ६१९०७ चौ. कि. वनक्षेत्राच्या संरक्षणाची व संवर्धनाची जबाबदारी आहे. या नैसर्गिक मालमत्तेचे मुल्य वेतनवार होणा-या खर्चाच्या रकमेच्या कित्येक पट जास्त आहे. वनक्षेत्र वनेत्तर कामासाठी वळती करताना नक्त वर्तमान मुल्य (NPV) वसुल करण्यात येते. NPV चे सद्याचे दर हे प्रति हेक्टर रु. १५,९५,७९०/- ते १०,६९,४७०/- असे आहेत. राज्यातील एकूण वनक्षेत्रास किमान NPV ने गुणल्यास (६१९०७०० हे. रु. १०,६९,४७०) रु. ६६,२०,७६,७९,२९,०००/- म्हणजेच रु. ६.६२.६७६ कोटी इतके आहे. म्हणजेच वरीलप्रमाणेवनसेवकांच्या वेतनावर होणारा खर्च हा वनक्षेत्राचे मुल्याच्या ०.०६% आहे. याचा विचार करता वेतनावर होणारा खर्च हा अत्यल्प आहे. या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण व संवर्धनाकरीता वनविभागाकडील मानव संसाधन मध्ये वाढ करणे गरजेचे आहे.

२४. वनसेवकांची वरीलप्रमाणे पदे निर्माण केल्यास खालीलप्रमाणे फायदे होणार आहेत.

(अ) मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण होतील.

(ब) नियमित वनसेवक उपलब्ध झाल्याने क्षेत्रीय कर्मचा-यांचे बळकटीकरण होईल व कार्यक्षमा वाढीस येईल.

(क) वरीलप्रमाणे वनसेवकांच्या पदनिर्मितीमुळे वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येईल.

पीडीएफ भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

IMG 20250627 101024 IMG 20250627 101045 IMG 20250627 101109 IMG 20250627 101126

Leave a Comment