लाडकी बहीण योजने निधी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित Ladki Bahin Yojana Insttalment Update

Ladki Bahin Yojana Insttalment Update:वाचा :-१) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एबावि-२०२२/प्र.क्र.२५१/का.६, दिनांक ३०.१०.२०२३.

२) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एबावि-२०२४/प्र.क्र.११२/का.६, दिनांक १४.०८.२०२४.

३) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एबावि-२०२४/प्र.क्र.९८/का.६, दिनांक ०९.०९.२०२४.

४) महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. एबावि-२०२४/प्र.क्र.८९/का.६, दिनांक २१.०३.२०२५.

५) आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र क्र. एबाविसेयो /अंगणवाडी/का-७/Mid Media /माहिती/२०२४-२५/६५८४, दि. २९.११.२०२४

शासन निर्णय :-

राज्यात दिनांक १ एप्रिल, २०२३ पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” योजना सुरू करण्यास संदर्भाधीन क्रमांक १ येथील दिनांक ३०.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

२. त्यानुषंगाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये या योजनेची जाहिरात प्रसिध्दी करण्याकरिता माध्यम आराखडा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यास संदर्भाधीन क्रमांक २ व ३ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती.

त्याप्रमाणे जाहिरात प्रसिध्दीची कार्यवाही करण्यात आल्यानंतर संबंधितांची देयके अदा करण्यास मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा यांचेकडून संदर्भाधीन क्रमांक ४ येथील पत्रान्वये प्राप्त झालेला होता.

त्यापैकी काही देयके अदा करण्याकरिता रु. ३.५० कोटी इतका निधी संदर्भाधीन क्र. ४ येथील दिनांक २१.०३.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आला आहे.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

IMG 20250610 WA0059

Leave a Comment