कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची थकबाकी अदा करणेबाबत ; शासन निर्णय ( GR ) निर्गमित दि.09.06.2025.Government Employees Commission Arrears

Government Employees Commission Arrears :महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून विशेष बाब म्हणून दिनांक ०१.०४.२००६ ते दिनांक २५.११.२०१४ या कालावधीतील ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी देणेबाबत.”

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून विशेष बाब म्हणून दिनांक ०१.०४.२००६ ते दिनांक २५.११.२०१४ या कालावधीतील ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी देणेबाबत मा. उपमुख्यमंत्री (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०९.०७.२०२४ रोजी दालन क्रमांक ३२. विधान भवन, मुंबई येथे सांयकाळी ०४.०० वाजता आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मा. उपमुख्यमंत्री (गृह) महोदयांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून विशेष बाब म्हणून दिनांक ०१.०४.२००६ ते दिनांक २५.११.२०१४ या कालावधीतील ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी देणेबाबत दिनांक २८.०८.२०२४, दिनांक ०५.०९.२०२४ व दिनांक १३.०१.२०२५ रोजीच्या पत्रान्वये आयुक्त (वस्त्रोद्योग) यांनी सदर प्रस्ताव सादर

SBI कडून पंधरा वर्षांसाठी 36 लाखांचे होम लोन घेतले तर किती रुपयांचा EMI भरावा लागणार? SBI Home Loan

केला आहे. या अनुषंगाने दि. २७.०५.२०२५ रोजी मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून विशेष बाब म्हणून दिनांक ०१.०४.२००६ ते दिनांक २५.११.२०१४ या कालावधीतील ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या. नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून विशेष बाब म्हणून दिनांक ०१.०४.२००६ ते दिनांक २५.११.२०१४ या कालावधीतील ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी एकूण रक्कम रूपये ११,९०,६९,४६३/- (अक्षरी-अकरा कोटी नव्वद लक्ष एकोणसत्तर हजार चारशे त्रेसष्ट रूपये) प्रदान करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. उपरोक्त विशेष बाब म्हणून देण्यात येणाऱ्या थकबाकीच्या रक्कमेसाठी नवीन लेखाशिर्ष निर्माण करून वित्त विभागाकडून निधी उपलब्ध करून घेण्याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०६०९१७३२१७९४०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

img 20250609 2025566176979281336142337

Leave a Comment