राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी – महागाई भत्ता 55%, निवृत्तीचे वय 60 वर्षे आणि पेन्शन योजनेबाबत थोडक्यात आढावा DA Hike News Update

DA Hike News Update:राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्या तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे – निवृत्तीचे वय वाढवणे, महागाई भत्त्यात वाढ आणि पेन्शन प्रणालीबाबत बदल. चला या मुद्द्यांचा थोडक्यात आढावा घेऊया.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

निवृत्तीचे वय 60 वर्षे करणेराज्य सरकारकडील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षांपर्यंत वाढवावे, अशी मागणी अनेक कर्मचारी संघटनांकडून वारंवार केली जात आहे. मात्र या मागणीला काही आमदार आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी गटांचा विरोध आहे. त्यामुळे हा निर्णय सध्या सरकारकडून प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

महागाई भत्ता 55 टक्के होण्याची शक्यता

केंद्र सरकारने 1 जानेवारी 2025 पासून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 2% महागाई भत्ता वाढवला आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे. वित्त विभागाने हा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पुढे पाठवला आहे, अशी माहिती समोर येत आहे.

राज्यात माहे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या काळात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी मदत निधी जाहीर !Aid announced for damage to agricultural crops due to unseasonal rains and hailstorms

पेन्शन प्रणालीतील पर्याय

सध्याच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेव्यतिरिक्त राज्य सरकारने दोन नवीन पर्याय देण्याचा विचार केला आहे – सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन योजना. मात्र या दोन्ही योजनांमध्ये नेमके काय बदल असतील, याची सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही. जुनी पेन्शन योजना जशी होती तसे फायदे मिळावेत, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी या तीनही विषयांवर अजूनही स्पष्ट निर्णय आलेला नसून, कर्मचारी संघटनांकडून वारंवार पाठपुरावा सुरू आहे. सरकारकडून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँक 20 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे, ऑनलाइन अर्ज कसा करावा…….! Maharashtra Garmin bank loans

Leave a Comment