भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मानधनात वाढ करणे…GR Election Commission BLO Salary Hike

Election Commission BLO Salary Hike:महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (Booth Level Officers) नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

२. मतदार नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे व यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची महत्वाची भूमिका आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांव्दारे विशेषतः मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविणे, विशिष्ट संवर्गाच्या मतदारांची नोंदणी यासाठी घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करणे, तसेच वेळोवेळी आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची विशेष माहिती गोळा करणे इ. कामे करण्यात येतात.

आजपासून एसटी बस तिकिटात मोठा बदल; नवीन तिकीट दर जाहीर! येथे पहा MSRTC Bus Ticket Rate

तसेच छायचित्र मतदार याद्यांची प्रतवारी सुधारण्यासाठी व त्या संपूर्णतः अचूक होण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer) यांना सहाय्य करणे, मतदारांना मतदार चिड्डी (Voter Slip) वाटप करणे व मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे इ. कामे ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) करीत असतात.

सदर कामे ते त्यांच्या मूळ कार्यालयातील कामे सांभाळून करीत असतात. त्याकरीता दिनांक २६ सप्टेंबर, २०१९ च्या शासन निर्णयान्वये भारत निवडणूक आयोगाच्या निदर्शानुसार मतदार केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) यांना प्रतिवर्षी रु.६,०००/- या दराने मानधन तसेच त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जावून केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी रु.१,०००/- वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येते.

३. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक २४.०७.२०२५ च्या पत्रान्वये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना रु.६,०००/- ऐवजी रु.१२,०००/- मानधन देण्याबाबत्त व प्रत्यक्ष पडताळणीसाठी (विशेष संक्षिप्त/संक्षिप्त पूनरिक्षण आणि इतर विशेष कार्यक्रम याकरिता) रु.१,००० ऐवजी रु.२,०००/-वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शासन निर्णय :-

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (Booth Level Officers) प्रतिवर्षी रु.६,०००/- ऐवजी १२,०००/- (रु. बारा हजार फक्त एवढे सुधारीत मानधन देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

दोन सिंहांमध्ये भयंकर लढाई; गडगडाटी डरकाळ्या, पंजांचा प्रहार व रक्तरंजित थरार, शेवटी कोण पडलं कुणावर भारी, पाहा VIDEO. Lion viral Video

२. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officers) यांना, त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी (विशेष संक्षिप्त/संक्षिप्त पूनरिक्षण आणि इतर विशेष कार्यक्रम याकरिता) रू. १,०००/- ऐवजी रु. २,०००/- या सुधारीत दराने वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. सदर सुधारित मानधन वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधनच्या उपरोक्त तरतूदी दिनांक ०१.०९.२०२५ पासून अनुज्ञेय होतील.

IMG 20250901 WA02521

Leave a Comment