DA Hike July 2025:केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. महागाई निर्देशांकाच्या (CPI-IW) ताज्या आकड्यांच्या आधारे, जुलै 2025 साठी महागाई भत्त्यात (DA) 4 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे सध्या 55 टक्के असलेला महागाई भत्ता 59 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. न्यूज 18 ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महागाई भत्ता दरवर्षी दोनदा – जानेवारी आणि जुलै महिन्यांपासून लागू होणाऱ्या – फेब्रुवारी-मार्च आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जाहीर केला जातो. या वाढीचा उद्देश कर्मचाऱ्यांना महागाईमुळे होणाऱ्या खर्चात भरपाई देणे हा आहे.
DA कसा ठरवला जातो?
महागाई भत्त्याची गणना औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) यावर आधारित असते. या निर्देशांकाचे मागील 12 महिन्यांचे सरासरी मूल्य घेऊन खालील सूत्रानुसार DA ठरवला जातो:
DA (%) = [(12 महिन्यांची CPI-IW सरासरी – 261.42) ÷ 261.42] × 100
येथे 261.42 हे 2016 हे मूळ वर्ष मानून निश्चित केलेले आधार मूल्य आहे.
आकड्यांची सद्यस्थिती
मे 2025 पर्यंत CPI-IW चे संपूर्ण आकडे अद्याप आलेले नसले तरी ग्रामीण महागाईचे आकडे काहीसे कमी झाले आहेत. मे महिन्यात CPI-AL (कृषी कामगारांसाठी) आणि CPI-RL (ग्रामीण कामगारांसाठी) अनुक्रमे 2.8 टक्के आणि 2.97 टक्क्यांवर घसरले आहेत, जे एप्रिलमध्ये 3.5 टक्क्यांपेक्षा अधिक होते.
जरी CPI-AL आणि CPI-RL थेट DA गणनेसाठी वापरले जात नाहीत, तरी हे आकडे महागाईच्या एकूण प्रवृत्तीचे निदर्शक असतात. त्यामुळे अंदाज व्यक्त केला जात आहे की DA मध्ये 3 ते 4 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
पगार वाढणार
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये आहे आणि त्यावर सध्या 55 टक्के DA मिळतो (9900 रु.) तर 4 टक्के वाढीनंतर हा भत्ता 10,620 रुपये इतका होईल, म्हणजेच 720 रुपये ची वाढ होईल.
अंतिम निर्णय केव्हा?
जून 2025 चा CPI-IW डेटा जुलै अखेरीस जाहीर होणार आहे. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ अधिकृतपणे DA वाढ जाहीर करेल. हा नवा दर जुलैपासून लागू होईल आणि कर्मचाऱ्यांना एरिअर्ससह रक्कम मिळेल.
8 वा वेतन आयोग लवकरच…
दरम्यान, 8व्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. त्यामुळे 7व्या वेतन आयोगाच्या अधीन असणारा किमान आणखी एक DA hike होण्याची शक्यता आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा