मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलैचा 13 वा हप्ता ₹1500 या तारखेला जमा होणार.Ladki Bahin Yojana 13th Beneficiary List

Ladki Bahin Yojana 13th Beneficiary List:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलैचा 13 वा हप्ता ₹1500 या तारखेला जमा होणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून, आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. ही योजना 28 जून 2024 रोजी सुरु करण्यात आली असून, जुलै 2024 ते जून 2025 दरम्यानचे 12 हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

13 वा हप्ता कधी जमा होणार?

महिलांना जुलै 2025 महिन्याचा 13 वा हप्ता मिळण्याची उत्सुकता आहे. यासंदर्भात एक आनंदाची बातमी आहे — सरकारकडून 25 जुलै 2025 पासून हप्ता जमा करण्यास सुरुवात होणार आहे. पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाईल.

कुणाला मिळणार नाही हप्ता?

राज्य सरकारकडून सध्या अर्जांची फेरतपासणी सुरू आहे. जे अर्ज शासनाच्या निकषांनुसार अपात्र ठरतात, अशा महिलांना हा हप्ता मिळणार नाही. ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन अर्ज केला असेल, त्यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

हप्ता जमा झाला की नाही, कसा तपासाल?

तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी पुढील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

अधिकृत वेबसाइटवर जा: https://ladakibahin.maharashtra.gov.in

“अर्जदार लॉगिन” या पर्यायावर क्लिक करा आणि लॉगिन करा.

लॉगिन केल्यानंतर “Applications Submitted” या पर्यायावर क्लिक करा.

Senior citizen Travelling Pass:आनंदाची बातमी या नागरिकांना ट्रेन आणि बस हाफ तिकीट सवलत लागू ! शासन राजपत्र जारी

तुमचा अर्ज यादीमध्ये दिसेल. त्यात शेवटी “Actions” या ऑप्शनवर क्लिक करा.

तिथे तुमचे सर्व जमा झालेले हप्ते पाहता येतील.

योजनेविषयी थोडक्यात

योजनेचे नाव: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना

सुरुवात तारीख: 28 जून 2024

लाभार्थी: 21 ते 65 वयोगटातील आर्थिक दुर्बल महिलांना

मदत रक्कम: ₹1500 प्रति महिना

अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन व ऑफलाइन

वेबसाईट: ladakibahin.maharashtra.gov.in

हेल्पलाइन: 181

जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून तपासणी करावी, आणि आवश्यक ती माहिती अद्ययावत ठेवावी.

भारतीय रेल्वेत तब्बल 30,307 पदांसाठी मेगाभरती!Indian Railway Recruitment 2025

Leave a Comment