Farmer Bounce:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ मध्ये नागपुरातील हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेवेळी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते. मात्र, आता ज्या शेतकऱ्यांनी धान शासकीय आधारभूत केंद्रावर विक्री केला अशाच शेतकऱ्यांना बोनस देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी धान आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केला किंवा नाही ही बाब गृहीत न धरता ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धान लागवडीची नोंद सातबारामध्ये नोंदविली आहे व
आभासी नोंदणी केली आहे. अशा धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, सहा महिन्यानंतरही शेतकऱ्यांचा खात्यात बोनस जमा झाला नाही.
याबाबत शेतकरी यादोराव
मुंगमोडे यांनी प्रभारी जिल्हा पणन अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ज्या शेतकऱ्यांनी धान शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केला अशाच शेतकऱ्यांना बोनस देण्यात येत असल्याचे सांगितले. ज्यांनी सातबारा आभासी केला आहे.
मात्र, धान खाजगी व्यापाऱ्यांकडे विक्री केला आहे, अशा शेतकऱ्यांना बोनस देण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शासन शेतकऱ्यांची फसवणूक तर नाही करत आहे ना, असा प्रश्न पालोरा येथील शेतकरी यादोराव मुंगमोडे यांनी उपस्थित केला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा