राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी – महागाई भत्ता 55%, निवृत्तीचे वय 60 वर्षे आणि पेन्शन योजनेबाबत थोडक्यात आढावा | State Governments Employee

State Governments Employee:राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्या तीन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे – निवृत्तीचे वय वाढवणे, महागाई भत्त्यात वाढ आणि पेन्शन प्रणालीबाबत बदल. चला या मुद्द्यांचा थोडक्यात आढावा घेऊया.

SBI मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती 2025.State Bank of India Bharti 2025

निवृत्तीचे वय 60 वर्षे करणे

राज्य सरकारकडील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षांपर्यंत वाढवावे, अशी मागणी अनेक कर्मचारी संघटनांकडून वारंवार केली जात आहे. मात्र या मागणीला काही आमदार आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी गटांचा विरोध आहे. त्यामुळे हा निर्णय सध्या सरकारकडून प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया निवड यादी जाहीर! यादीत नाव पहा 11th Admission List Published

महागाई भत्ता 55 टक्के होण्याची शक्यता

केंद्र सरकारने 1 जानेवारी 2025 पासून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 2% महागाई भत्ता वाढवला आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे. वित्त विभागाने हा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पुढे पाठवला आहे, अशी माहिती समोर

पेन्शन प्रणालीतील पर्याय

सध्याच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेव्यतिरिक्त राज्य सरकारने दोन नवीन पर्याय देण्याचा विचार केला आहे – सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आणि युनिफाईड पेन्शन योजना. मात्र या दोन्ही योजनांमध्ये नेमके काय बदल असतील, याची सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही. जुनी पेन्शन योजना जशी होती तसे फायदे मिळावेत, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी या तीनही विषयांवर अजूनही स्पष्ट निर्णय आलेला नसून, कर्मचारी संघटनांकडून वारंवार पाठपुरावा सुरू आहे. सरकारकडून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांसाठी तब्बल 14582 रिक्त जागांसाठी भरती SSC Staff Selection Recruitment 2025

Leave a Comment