सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील सुट्टयांची यादी जाहीर ; परिपत्रक निर्गमित दि.27.06.2025 | School Holiday List 2025

School Holiday List 2025:सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील सुट्टयांबाबत..नाशिक, दिनांक २७/०६/२०२५

संदर्भः । महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण क्क्रीडा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण- 2023/प्र. क्र. 105/एम डी.-दि.20 एप्रिल, 2023.

2. महाराष्ट्र शासन राजपत्र, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई दिनांक 04 डिसेंबर, 2024 सार्वजनिक मुट्टया 2025

3  मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांचे परिपत्रक क्रमांक संकीर्ण/साश-3/ 2025 ना.क्र.14 दि. 28/01/2025

4. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय रा. पुणे यांचे संयुक्त

परिपत्रक कशिसं-२४/(अं-०१) उन्हाळा मला एस-१/२२०६ दिनांक १८ एप्रिल २०२४

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये माध्यमिक शाळा संहिता क्र.52.2 कडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. माध्यमिक शाळा संहिता क्र.52.2 अन्वये शासनाने घोषित केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या माध्यमिक शाळांना देणे बंधनकारक आहे.

त्यामुळे कोणतीही संस्था व्यक्ती यांना शासनाने अधिसुचित केलेल्या सुट्टीच्या दिवशी शाळा चालु ठेवून त्याऐवजी अन्य पर्यायी सुट्टी घेता येणार नाही. नाशिक जिल्हयातील राज्यशासनाव्दारे मान्यता प्राप्त सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना सन 2025-26 या

शैक्षणिक वर्षात खालील प्रमाणे सोबत जोडलेल्या यादीनुसार शालेय सुट्ट‌या राहतील. याबाबत अधिक सूचना खालीलप्रमाणे आहेत. अ) सहया

1. मा. विभागीय आयुक्त नाशिक यांनी जाहीर केलेल्या सुट्टया 03 दिवस

2. मुख्याध्यापक अधिकारातील सुट्टया -03 दिवस

3. सार्वजनिक शासकीय वैकल्पिक सुट्टया 20 दिवस

4. दीपावलीची तारीख दिनांक 17/10/2025 ते 01/11/2025-13 दिवस

5. उन्हाळी सु‌ट्टी दिनांक 02/05/2026 ते 13/06/2026-37 दिवस

एकूण सुट्टयांचा कालावधी -76 दिवस.

ब) सत्र कालावधी- 1. प्रथम सत्र दि.16/06/2025 ते 16/10/2025

2. विदितीय सत्र दि.03/11/2025 ते 01/05/2026

क) पुढील शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये शाळा सोमवार दिनांक 15 जून, 2026 रोजी सुरू होतील / उघडतील.

1. एखादया शाळेला नाताळ गणेश उत्सव यासारख्या सणांचे प्रसंगी अगर इतर कालावधीत यादीत दर्शविलेल्या दिवसांपेक्षा अधिक सुट्ट्या द्यावयाच्या असतील तर त्या सुट्ट्या दीर्घ सुट्ट्यांचा (उन्हाळयाची दीपावलीची सुट्टी) कालावधी कमी करून या कार्यालयाच्या परवानगीने समायोजित करून घेता येतील. त्यासाठी स्वतंत्र तारखा ठरवून देण्याचे प्रयोजन नाही.

2. माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकुण सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. एकूण कामकाजाचे दिवस 230 होणे आवश्यक आहे.

3. प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर हे कर्मचारी बगळून इतर सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्ट्या अनुज्ञेय नाहीत. मात्र दोर्ष सुट्टीच्या कालावधीत ज्या सार्वजनिक सुट्ट्या असतोल त्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय राहतील.

4. मुख्याध्यापकांनी त्यांच्या अखत्यारीतील स्थानिक सुट्टयांची शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच निश्चित्ती करून शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद नाशिक यांच्या कार्यालयास अवगत करावे.

5. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या व मा. विभागीय आयुक्तांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या शाळांनी घेणे बंधनकारक आहे. त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

6. या सुट्टयां व्यतिरिक्त विद्यार्थी हिताच्या अत्यंत महत्त्वाच्या कारणामुळे जर यादीतील सुट्ट्यां व्यतिरिक्त शाळांनी सुट्ट्या घेतल्या असल्यास त्याप्रमाणात मुख्याध्यापकांच्या अधिकारातील सुट्ट्या कमी कराव्यात.

7. थोर नेते / देश भक्त यांच्या जयंती पुण्यतिथीच्या दिवशी सुट्टी जाहीर केलेली नसल्यास अशा वेळी शाळा भरल्यानंतर पहिल्या सत्राच्या कालावधीत जयंती / पुण्यतिथी साजरी करावी व सुट्टी जाहीर केलेली असल्यास शाळेत त्याच दिवशी विहित पध्दतीने साजरी करावी व नोंदी ठेवाव्यात.

3. शासनाद्वारे चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळा निवासी स्वरुपाच्या असल्याने त्यांच्या सुट्टया शाळांमध्ये उपलब्ध अन्य सुविधांच्या अनुषंगाने असतात म्हणून या सुट्टयांमध्ये मा. आयुक्त प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग हे यांच्या सोयीने बदल करू शकतील,

9. सन 2025-2026 मधील सुट्टयांच्या यादी मध्ये काही त्रुटी असल्यास शासनाने जाहीर केलेल्या दिवशी सुट्टी द्यावी. शासनाचे वेळोवेळी प्रसिध्द होणारे परिपत्रक, आपत्कालीन परिस्थितीमुळे अथवा त्रुटींमुळे सुट्टयांच्या यादीत बदल करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (माध्य) यांनी राखून ठेवले आहेत.

शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

img 20250628 0738513421885109556853371

Leave a Comment