Online Password Change Announcement:१६ अब्ज ऑनलाईन पासवईस व ओळख डेटा चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या ‘इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ने (सीईआरटी-इन) नागरिकांसाठी एक सल्लापत्र (अॅडव्हायजरी) जारी केले असून सर्व ऑनलाईन पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे.
या डेटाचा वापर करून सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार होण्याचा धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर ‘सीईआरटी-इन’ने सल्लापत्र जारी केले आहे. सोमवारी हे सल्लापत्र पहिल्यांदा जारी झाले होते.
राज्यात ५ दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी | IMD Rain Alert Today
प्राप्त माहितीनुसार, ऑनलाईन क्रेडेन्शिअल्सची ही जगाच्या इंटरनेट इतिहासातील सर्वात मोठी चोरी आहे. डार्क वेबवर असलेल्या राक्षसी डेटाबेसने ३० वेगवेगळ्या सोतांकडून ही चोरी केली आहे.
वीन पासवर्ड
आम्हाला वापरकर्तानाव
पासवर्ड
साइन इन करा
सरकारने काय म्हटले?
सर्व प्रकारच्या ऑनलाईन वापर डेटाशी संबंधित पासवईस नागरिकांनी तातडीने बदलून घ्यावेत.
आपल्या खात्यांच्या सुरक्षेसाठी मल्टी-फॅक्टर ऑथेन्टिकेशन (एमएफए) लागू करावे. शक्य असेल तिथे पासकीजचा वापर करावा.
वापरकर्त्यांनी आपल्या सर्व प्रकारच्या उपकरणांत अँटिव्हायरस स्कॅन्स सुरू करावेत. मालवेअरपासून संरक्षण करणाऱ्या यंत्रणा अद्ययावत ठेवाव्यात.
जगात सर्वाधिक वापरले जाणारे १० पासवर्ड
१२३४५६ । प्रशासन । १२३४५६७८ । पासवर्ड । १२३४५६७८९ । अतिथी आय क्वर्टी | १२३४५ । १२३१२३ । abc123
(हे पासवर्ड केवळ एका सेकंदात क्रॅक केले जातात)
कंपन्यांनी काय करावे?
सायबर सुरक्षा संस्थेने म्हटले की, कंपन्यांनी एमएफए लागू करावेत, वापरकर्ता संपर्क मर्यादित करावा आणि संशयास्पद घटितांचा शोध घेण्यासाठी इन्टूजन डिटेक्शन सिस्टिम्स (आयडीएस) व सेक्युरिटी इन्फॉर्मेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट (एसआयईएम) साधनांचा वापर करावा, आपला डेटाबेस सार्वजनिक होणार नाही, याची खबरदारी घ्यावी तसेच संवेदनशील डेटा इन्क्रिप्टेड राहील याची काळजी घ्यावी, अशी शिफारसही संस्थेने केली आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा