मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबत , GR निर्गमित दि.19.06.2025 | Regarding exemption from passing Marathi and Hindi language exams

Regarding exemption from passing Marathi and Hindi language exams:भाषा संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत.

वाचा : १. सामान्य प्रशासन विभाग, शासन अधिसूचना क्र. मभाप-१०८७/१४/सीआर-२/८७२०, दि.३० डिसेंबर, १९८७.

२. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. हिंभाप-१९७९-२८, दि.१० जून, १९७६

३. मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. मभाप-२०२१/प्र.क्र.१०९/भाषा-२, दि. २१.०७.२०२३

शासन परिपत्रक :-

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विहित केलेल्या परीक्षांसाठी नियुक्त केलेली सर्व एतदर्थ मंडळे वाचा क्र.३ येथील दि.२१ जुलै, २०२३ च्या शासन निर्णयानुसार बरखास्त करण्यात आली आहेत.

सदर शासन निर्णयानुसार मराठी भाषा परीक्षा, हिंदी भाषा परीक्षा, मराठी टंकलेखन परीक्षा व मराठी लघुलेखन या सर्व परीक्षा भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येत आहेत.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात ग्रंथपाल, वाहनचालक, औषध निर्माता व इतर 1107 पदांची भरती | Department of Medical Education and Research Recruitment 2025

तसेच सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणे, अभ्यासक्रम निश्चित करणे, उमेदवाराकडून अर्ज मागविणे, अर्जाची छाननी करणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांची छपाई करणे, गुण देण्याची कार्यपध्दती, निकाल जाहीर करून परीक्षार्थी उमेदवारांच्या कार्यालयांना कळविणे इत्यादी परीक्षांच्या नियोजनासदर्भातील सर्व बाबींची जबाबदारी “भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य” यांची आहे.

त्यामुळे यापूर्वीच्या वाचा क्र.१ येथील दि.३०.१२.१९८७ व वाचा क्र.२ येथील दि.१०.०६.१९७६ व व याव्यतिरिक्त ज्या शासन निर्णय व शासन परिपत्रकामध्ये ” एतदर्थ मंडळाच्या परीक्षा” असे लिहिलेले असेल याऐवजी “भाषा संचालनालयाच्या परीक्षा” असे वाचावे.

बँक ऑफ बडोदा मधून मिळवा 2 मिनिटात 5 लाख/- रुपये कर्ज | Bank of Baroda personal Loan 2025

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०६१९१२५९४३६३३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! जुलैमध्ये महागाई भत्ता (DA) 57% होणार, नवीन आकडेवारी जारी DA Hike Update 2025

img 20250620 0654127382576322357135581

Leave a Comment