या वाहनावर आता कोणतीही कारवाई होणार नाही ? परिवहन विभागाचं परिपत्रक जारी.Transport Department Circular

Transport Department Circular:पर्यावरणास अनुकूल, व्यायामाचे एक साधन त्याचप्रमाणे कोणत्याही भागाच्या शेवटच्या स्थानापर्यंत सहज जाता येते याकरीता जगातील अनेक देशांमध्ये बरेचजण वाहनाचा वापर न करता सायकलचा वापर करत असतात.

याकरीता बरेचसे वाहन धारक आपल्या वाहनाच्या पाठीमागे Cycle Carrier बसवून त्याचा वापर सायकल वाहून नेण्यासाठी करत असतात, आपल्या देशातही वाहनधारक वाहनाच्या पाठीमागे Cycle Carrier बसवून सायकल वाहून नेताना आढळतात.

आनंदाची बातमी : आजपासून एसटी महामंडळाचा मोठा निर्णय MSRTC School Students Free Pass

मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमात वाहनांच्या पाठीमागे Cycle Carrier लावण्याबाबत कुठेही प्रतिबंध नाहीत. असे असताना देखील अशा वाहनांवर परिवहन विभाग तसेच पोलीस विभाग यांच्या अंमलबजावणी पथकांमार्फत कारवाई केली जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. परंतु, वाहनांच्या पाठीमागे Cycle Carrier लावण्याबाबतची पध्दत, ही जगात प्रचलीत आहे.

सबब, आपणांस सूचित करण्यात येते की, वाहनाच्या पाठीमागे इतर वाहनांना कोणत्याही प्रकारे अडचण/अडथळा निर्माण होणार नाही अशा प्रकारे बसविण्यात आलेल्या Cycle Carrier द्वारे Cycle वाहून नेत असल्यास, अशा वाहनांवर यापुढे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये.

महत्त्वाची माहिती येथे क्लिक करून पहा 

IMG 20250617 WA0000

Leave a Comment