State Employees Sevarth ID EKYC:सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व नियमित शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची माहिती भरण्यात आलेली आहे. सदर माहितीनुसार अधिकारी/कर्मचाऱ्यांचे वेतन आहरीत होत असते. सदर माहितीमध्ये त्यांच्या बँक खात्याच्या माहितीसोबतच संबंधित कर्मचाऱ्यांचा PAN क्रमांक, आधार क्रमांक नोंदविलेला आहे.
एकंदरीतच पूर्ण माहितीमध्ये कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्यांची दुबार माहिती सेवार्थ प्रणालीत नोंद होऊ नये तसेच कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्यास दुबार वेतन अदा होऊ नये, याकरीता शासनाने ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास अनुसरुन, सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
शासन परिपत्रक :-
१. सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांनी माहे एप्रिल, २०२६ देय मे, २०२६ या वेतन देयकांअगोदर ई-केवायसी पूर्ण करावयाची आहे. सदर ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी /कर्मचारी यांचे माहे एप्रिल, २०२६ देय माहे मे, २०२६ चे वेतन आहरीत करण्यात येणार नाही.
२. सदर ई-केवायसी पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी/कर्मचारी यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेले बैंक खाते सेवार्थ प्रणालीत अद्ययावत केले असले पाहिजे. सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असलेले बैंक खाते आधार क्रमांकांशी संलग्न नसेल तर असे खाते त्वरीत बदलण्यात येऊन सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकांशी संलग्न असलेले बैंक खाते अद्ययावत करण्यात यावे.
३. तसेच सेवार्थ प्रणालीत नोंदविलेला PAN क्रमांक चूकीचा असल्यास, नोंदविण्यात आलेला PAN क्रमांकाची दुरुस्ती करुन अद्ययावत करण्यात यावा.
४. सदर ई-केवायसी प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांनी व्यक्तिशः पूर्ण करुन त्याचे प्रमाणपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे जमा करावयाचे आहे. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी असे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीत देण्यात आलेल्या ई-केवायसी अपडेशन रिपोर्टमध्ये सदर अधिकारी / कर्मचारी यांची नोंद करावयाची आहे.
सदर नोंद करतांना ई-केवायसी अन्वये पडताळणी करण्यात आलेला बैंक खात्याचा तपशील व सेवार्थ प्रणालीत नोंदविण्यात आलेला बैंक तपशील या दोहोंमध्ये साम्य असल्यासच सदर नोंद घेण्यात यावी अन्यथा प्रथम ई-केवायसी केल्याप्रमाणे सेवार्थ प्रणालीत बैंक खात्याचा तपशील अद्ययावत करावा.
विषय :- सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांचे ई-केवायसी पूर्ण करणेबाबत.
संदर्भ :- राज्य परिपत्रक क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र.२९/कोषा-४/२६ दि. २७/०३/२०२६.
अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, गु.अ.वि, मुंबई. या कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत सर्व अधिकारी/कर्मचारी/मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी/वर्ग ४ चे कर्मचारी यांना कळविण्यात येते की, संदर्भात शासन परीपत्रकाअन्वये शासनाने विहित केल्यानुसार सर्व अधिकारी/कर्मचारी/मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी/वर्ग ४ वे कर्मचारी यांनी माहे एप्रिल २०२६ च्या वेतन देयका अगोदर ई-केवायसी पूर्ण करून बॉकेमार्फत पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.
यास्तव सदर शासन परीपत्रकावे अवलोकन करण्यात येऊन सर्व अधिकारी/कर्मचारी/मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी/वर्ग ४ चे कर्मचारी यांनी आपले वेतन ज्या बँक खात्यात आहारीत करण्यात येते, ते बँक खाते आपल्या आधार क्रमाकांशी संलग्न आहे किंवा कसे? याबाबत सोबतव्या ई-केवायसी नमुना (Form) मध्ये माहिती भरून बँकेमार्फत पडताळणी करून घ्यावी व सदर फॉर्मची स्वतंत्ररित्या PDF करण्यात येऊन सदरची माहिती आपल्या अधिपत्याखालील युनिट/शाखा एकत्रीत Pen Drive मध्ये संकलीत करावी.
व आपल्या अधिपत्याखालील युनिट/शाखा Pen Drive मध्ये सर्व अधिकारी/कर्मचारी/मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी/वर्ग ४ चे कर्मचारी यांची माहिती व फॉर्मची स्वतंत्ररित्या संकलीत केलेली PDF दिनांक १३/०४/२०२६ पर्यंत प्रशासकीय अधिकारी, गुन्हे शाखा, मुंबई या कार्यालयास खास दुतामार्फत पाठविण्यातबाबत सुचित करावे.
तसेच सेवार्थ प्रणालीतील पॅन क्रमांक व आधार कार्ड क्रमांक चुकीचा असल्यास पॅन क्रमांक व आधार कार्ड क्रमांक दुरूस्ती करून सोबत जोडलेल्या यादीमधील रकान्यात योग्य तो पॅन क्रमांक व आधार कार्ड क्रमांक नमुद करण्यात यावा