आईशप्पथ ! विरार लोकलमध्ये तरुणींचा तडका; ‘गणबाय मोगरा’ गाण्यावर दोघी अशा थिरकल्या की सगळे बघतच राहिले; VIDEO व्हायरल…Virar Local Train Viral Video

Virar Local Train Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ लोकल ट्रेनमधला आहे. व्हिडीओत तुम्हाला लोकलमधील कलेचे दर्शन होईल.

लोकल हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात लोकल ही मुंबईकरांसाठी जीव की प्राण आहे. थकून भागून आलेले लोक थोडावेळ का होईना आपला खास वेळ या लोकलमध्ये घालवतात.

यात महिला डब्यातील मजा काही वेगळीच असते. रोज प्रवास करणाऱ्यांच्या ओळखी झाल्यामुळे लोकलमध्ये महिलांचे अनेक ग्रुप्स असतात. अशात काहीजणी मजा मस्ती करण्याची कसलीच कसर सोडत नाहीत.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात विरार लोकलमध्ये दोन तरुणी थिरकताना दिसतायत. एवढ्या गर्दीत जिथे उभं राहायला जागा नसते तिथे या मुली कशा डान्स करतायत एकदा पाहाच…

व्हायरल व्हिडीओ (Ganbai Mogra Dance Video Viral)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची सुरुवात विरारच्या भरगच्च लोकलमधील महिला डब्यात होते. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दोन तरुणी सध्या ट्रेंडिंग असलेल्या गाण्यावर थिरकताना दिसतायत.

‘गण बाई मोगरा’ या मराठी गाण्यावर दोघी अगदी जोशात डान्स करताना दिसत आहे. हुबेहूब डान्स स्टेप्स करत त्यांनी या गर्दीत कशीबशी आपली कला सादर करण्याचा छान प्रयत्न केला आहे. या दोघींचा डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी त्यांच्या या डान्सचं खूप कौतुकदेखील केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @pgautam2615 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच याला ८०.३ हजार व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, “लोकलमध्ये भारी जमला हा डान्स”. दुसऱ्याने, “आपल्या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ स्वतः साठी काढताय खूप मस्त…

तुमचे अजून व्हिडिओ बघायला नक्कीच आवडतील”, अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “एक नंबर, खूपच एनर्जेटिक”. तर खूपच सुंदर, Expressionss एक नंबर, अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas