शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी अपडेट, ‘या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, वाचा सविस्तर.Shetkari Karjmafi

Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफी विषयी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आले आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आहे.

राज्य शासनाने २०२६ च्या अर्थसंकल्पी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे.

याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करत आहेत. अशा शेतकऱ्यांना देखील ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रवीण परदेशी समिति कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया राबवणार आहे. यामध्ये दोन लाख रुपयांची कर्जमाफी कशी कशी असणार आहे. राज्यातील अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक शेतकरी कर्जमाफीची गरज आहे. त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, याकरिता एसओपी तयार होत आहे.

ते पुढे म्हणाले, धन दांडग्या लोकांना ज्यांच्याकडे गाडी, बंगला आहे, फार्म हाऊस आहे, अशा लोकांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे, असा सवाल देखील यावेळी बावनकुळे यांनी उपस्थित केला. ज्या गरीब माणसाला कर्जमाफी दिली पाहिजे, अशा शेतकऱ्यांची SOP तयार करणे चालू आहे. या प्रक्रियेसाठी थोडा उशीर होईल, मात्र कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

कर्जमाफी कोणाची होणार ?

दरम्यान या कर्जमाफी मध्ये कोण पात्र, कोण अपात्र होणार याबाबत अद्यापही शेतकऱ्यांमध्ये संभ्रमता आहे. कारण कर्जमाफी विषयीची निकषता शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक अभ्यास गट समिती नेमण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

हा अहवाल सादर केल्यानंतर ही कर्जमाफी कोणाची होणार आहे हे निश्चित होणार आहे. कर्जमाफी किचकट प्रक्रियेच्या माध्यमातून राबवली जाईल, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत सूतोवाच दिले आहे.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas