SSC आणि HSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! मार्कशीट आणि सर्टिफिकेटबाबत बोर्डाने घेतला मोठा निर्णय.HSC SSC Borad Exam Update

HSC SSC Borad Exam Update:महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती हाती आली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता दहावीची मार्कशीट आणि सर्टिफिकेटसाठी करावी लागणारी प्रतीक्षा आता संपणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफेकेट एकाच वेळी मिळणार आहे.

दोन्ही मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर विद्यार्थ्याचा फोटो आणि एक क्युआर कोड देखील असणार आहे. या क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्याची माहिती सहज मिळणार आहे. यामुळे बोगस मार्कशीट आणि सर्टिफिकेट त्वरित ओळखता येईल.

निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना निकालाची प्रत दिली जायची. त्यानंतर सुमारने सहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले जायचे. मार्कशीट आणि सर्टिफिकेटमध्ये फोटो आणि क्युआर कोड स्कॅन करण्याची सुविधा नव्हती.

खरंतर बोर्ड लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल घोषित करण्याच्या तयारीत आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात जाहीर केला होता. यंदा बारावीचा निकाल आधी लागेल. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

बोगस मार्कशीट त्वरित ओळखता येणार

मागील काही वर्षांपासून बोगस मार्कशीटचे प्रकरण समोर येत होते. खरंतर बोगस मार्कशीट ओळखण्यात फार उशीर लागत होता. आता क्यूआर कोडच्या मदतीने काही सेकंदात निकालाची सत्यता पडताळता येणार आहे.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas