Maharashtra HSC result 2026 expected date and time : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार? याकडे सर्वांच्या नजरा (Maharashtra SSC & HSC Result Date 2026) लागल्या आहेत.
खात्रीलायक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात (१५ मे नंतर) बारावीचा निकाल (HSC Result 2026 Maharashtra) लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर त्यानंतर आठ ते १० दिवसात दहावीचा निकाल (SSC Result 2026 Maharashtra) जाहीर होऊ शकतो.
मात्र ही अधिकृत घोषणा नाही. मागील काही वर्षांतील अंदाज पाहिला तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर दोन आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.
निकालाच्या आदल्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी बोर्डाकडून याची अधिकृत माहिती दिली जाईल. (Maharashtra HSC result 2026 expected date and time)
२०२६ निकालाचा अंदाजित वेळ (दुपारी १ वाजता निकाल ऑनलाइन उपलब्ध होतो). When Will Class 10 and 12 Results Be Declared
१२ वी (HSC) : मे २०२६ चा पहिला किंवा दुसरा आठवडा
१० वी (SSC): मे २०२६ चा दुसरा किंवा तिसरा आठवडा
मागील ३ वर्षांतील निकालाच्या तारखा MSBSHSE result 2026 latest update and prediction
दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत झाल्या. तर बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात आली. आता निकालाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. गेल्या काही वर्षांतील निकालाच्या तारखा पाहिल्या तर बारावीचा निकाल आधी लागतो आणि त्यानंतर साधारण १० ते १५ दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जातो.
२०२५ मध्ये बारावीचा निकाल ५ मे २०२५ रोजी जाहीर झाला होता. तर दहावीचा निकाल १३ मे २०२५ रोजी जाहीर झाला होता.
२०२४ मध्ये २१ मे २०२४ रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता. तर २७ मे २०२४ रोजी दहावीच्या मुलांचा निकाल बोर्डाकडून जाहीर करण्यात आला होता.
२०२३ मध्ये बारावीचा निकाल २५ मे २०२३ रोजी जाहीर झाला होता. तर दहावीचा निकाल २ जून २०२३ रोजी बोर्डाकडून जाहीर करण्यात आला.
दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल कुठे पाहाल? SSC result 2026 Maharashtra official website link
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org (१२ वी साठी)
sscresult.mkcl.org (१० वी साठी)
mahahsscboard.in
निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही वरील अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता. पण निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याचा सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother’s Name) असणे आवश्यक आहे. how to check Maharashtra board result online 2026
अफवांवर विश्वास ठेवूच नका –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) अद्याप २०२६ च्या दहावी आणि बारावीच्या निकालासाठी कोणतीही अधिकृत तारीख किंवा निश्चित वेळ जाहीर केलेली नाही. दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखा जवळ आल्यानंतर अफवांचे पेव फुटते. अनेक दावे, प्रतिदावे केले जातात.बोर्डाच्या निकालाच्या तारखांबाबत अनेक अफवा किंवा ‘फेक’ मेसेजेस फिरत असतात. त्यावर विश्वास न ठेवता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला प्राधान्य द्या. निकालाची तयारी झाल्यानंतर बोर्डाकडून बारावी आणि दहावीच्या परीक्षेबाबत अधिकृत माहिती दिली जाते.