How To Clean Water Tank Easy Trick:हे दुषित पाणी रोजच्या वापरात येतं तेव्हा धोका अधिक वाढतो. जोपर्यंत पाण्याचा दुर्गंध येत नाही किंवा पाण्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत लोक दुर्लक्ष करत राहतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची आवश्यकता खूप जास्त असते. अशा स्थितीत काही लोक पाणी साठवून ठेवण्यासाठी पाण्याच्या टाक्या किंवा ड्रमचा वापर करतता. असं पाहिलं जातं की टाकी बसवल्यानंतर टाकीच्या नियमित स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास हळूहळू त्यात घाण जमा होऊ लागते.
टाकीत माती, धूळ आणि छोटे छोटे कचऱ्याचे कण आत बसतात जे पाण्याची गुणवत्ता खराब करतात. (How To Clean Water Tank Easy Trick)
हे दुषित पाणी रोजच्या वापरात येतं तेव्हा धोका अधिक वाढतो. जोपर्यंत पाण्याचा दुर्गंध येत नाही किंवा पाण्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत लोक दुर्लक्ष करत राहतात. म्हणून वेळोवेळी टाकीची साफसफाई करणं गरजेचं असतं.
हिवाळ्याच्या दिवसांत बॅक्टेरिया आणि फंगस वेगानं वाढतात. ज्यामुळे पाणी लवकर खराब होतं. टाकी जर वेळीच साफ केली नाही तर आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. (How To Clean Water Tank Naturally)
टाकी साफ करण्याची सोपी पद्धत
टाकी साफ करण्यासाठी सगळ्यात आधी टाकीतलं पाणी काढून टाका. नंतर बादली किंवा मगच्या मदतीनं उरलेलं पाणीही काढून घ्या. त्यानंतर डिटर्जेंटचे पाणी घालून ब्रशच्या साहाय्यानं टाकी आतल्या बाजूनं घासून घ्या. टाकीच्या भिंती आणि खालचा भाग घासून व्यवस्थित स्वच्छ करा. टाकीचे कोपरे व्यवस्थित स्वच्छ होतील याची काळजी घ्या जेणेकरून जास्त घाण जमा होणार नाही. त्यानंतर हे पाणी बाहेर ओता.
तुरटीची पावडर आणि ब्लिचिंग पावडर एकत्र करून टाकीच्या टाकीत हे मिश्रण ओता. काहीवेळ तसंच ठेवल्यानंतर पाण्यानं टाकी धुवून घ्या. या प्रक्रियेमुळे टाकीच्या आतील हानीकारक तत्व 10 ते 15 मिनिटांत नष्ट होतात आणि पाणी वापरायोग्य ठरतं आणि बॅक्टेरियाजपासून टाकी सुरक्षित राहते. शेवटी टाकीत पुन्हा पाणी घालून स्वच्छ करून घ्या.
कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा घाण टाकीत राहणार नाही याची काळजी घ्या. पाण्याची टाकी 2 ते 3 महिन्यातून एकदा नक्की स्वच्छ करा. खासकरून जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात तेव्हा या गोष्टीची विशेष काळजी घ्या. जेणेकरून तुम्ही आजारांपासून वाचू शकता आणि घरही सुरक्षित राहील.