Land Record News 2026:राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला राज्यात ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात येत्या सहा महिन्यांत पाच ठिकाणी अशी खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.
त्यात मुंबईत दोन, तर पुणे, ठाणे व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी एक कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या तीन महिन्यांत २५ ठिकाणी अशी कार्यालये सुरू होतील.
या खासगी कार्यालयांतून दस्त नोंदणी करण्यासाठी सुमारे सव्वापाच हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.
दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी, अपुऱ्या सुविधा आणि वेळेचा अपव्यय या बाबी लक्षात घेऊन नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने ६० ठिकाणी अशी कार्यालये सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली.
त्यानुसार ‘व्हीएफएस ग्लोबल’ या कंपनीने यात स्वारस्य दाखविले. या कंपनीला ६० कार्यालये सुरू करण्यास कार्यारंभआदेश दिले आहेत.
पहिल्या टप्प्यात मुंबईत दोन, तर पुणे ठाणे व नागपूर येथे प्रत्येकी एक खासगी कार्यालये सुरू होणार आहेत.
येथे होणार दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यात त्यानंतरच्या तीन महिन्यांत राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ठिकाणी प्रत्येकी चार, तर नाशिक, नागपूर व संभाजीनगर येथे प्रत्येकी तीन अशी एकूण २५
कार्यालये सुरू होतील. तिसऱ्या टप्प्यात एकूण ३० कार्यालय सुरू होतील.
त्यात अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, पालघर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक कार्गालग टोर्टल