सोन्या-चांदीच्या दरात भूकंप, एका झटक्यात सिल्व्हर ₹३१,००० पर्यंत स्वस्त, ₹१३,००० नं आपटलं गोल्ड.Gold Silver New Rate Today

Gold Silver New Rate Today:२२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर, आज हा दर १,३४,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून यात १२,०२८ रुपयांची घसरण झाली आहे. शुक्रवारी याची किंमत १,४६,६२८ रुपये होती.

१८ कॅरेट सोन्याचे दर

१८ कॅरेट सोन्याचा दर आज सोमवारी १,२३,७८९ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. यापूर्वीचा बंद भाव १,३४,८५२ रुपये होता, म्हणजेच यात ११,०६३ रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे, bullions.co.in नुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असून ते १,४५,५२० रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे.

आजचा चांदीचा भाव

IBJA च्या आकडेवारीनुसार, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत २,०१,५०० रुपये आहे. गेल्या शुक्रवारी चांदी २,३२,३६४ रुपये प्रति किलो दरानं विकली जात होती.

म्हणजेच आज चांदीच्या दरात ३०,८६४ रुपये प्रति किलोची घसरण झाली. दरम्यान, bullions.co.in वर चांदी २,२७,९६० रुपये प्रति किलो दरानं विकली जात असून तिथं हलकी वाढ दिसून येत आहे. IBJA दिवसातून दोनदा सोन्या-चांदीचे दर जाहीर करते.

Leave a Comment