Pik Vima Yojana : पीक विमा योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. खरीप २०२४ आणि रब्बी हंगाम २०२४-२५ या वर्षातील पीक विमा योजनेचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान” योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना- रब्बी हंगाम २०२४-२५ करिता ३५ लाख ९६ हजार २६० रुपये इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
तर पीक विमा योजना- खरीप हंगाम २०२४ करिता ५ कोटी ८ लाख ५४ हजार ९५३ रुपये इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्या अनुषंगाने या दोन्ही बाबीसंदर्भात निर्णय घेण्यात आला असून यास मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार दोन शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आले आहेत. आता पात्र शेतकऱ्यांना लवकरच याचे वाटप केले जाणार आहे.
यामध्ये संबंधित पात्र शेतकऱ्यांनी ज्या विमा कंपन्यांच्या माध्यमातुन पीक विमा काढला आहे. त्या कंपन्यांच्या माध्यमातून विमा वितरित केला जाणार आहे.
यामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी, चोलामंडलम एम.एस. ज. इं. कं., एचडीएफसी इर्गो ज. इं. कं. लि, आयसीआयसीआय लोंबार्ड ज. इं. कं., ओरिएन्टल इंन्शुरन्स कं. लि., रिलायन्स ज. इं. कं.लि., एसबीआय जनरल इंन्शुरन्स कं.लि., युनायटेड इंडिया इ. कं. लि., युनिव्हर्सल सोम्पो ज. इं. कं.लि. या विमा कंपन्यांचा समावेश आहे.