LPG सिलिंडरला मिळाला आणखी एक पर्याय, तयार केला रॉकेट स्टोव्ह, गॅस शिवाय २ मिनिटांत बनतं जेवण
Viral Hack Cooking Stove: सध्या देशभरात LPG गॅसचा तुटवडा जाणवतोय. पण यावर समस्या म्हणून एका व्यक्तीनं रॉकेट स्टोव्ह तयार केलाय. जो कमी लाकडांमध्ये जास्त उष्णता देतो. चला पाहूया व्हायरल व्हिडीओ.
इस्राईल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्व आशियात गोंधळ निर्माण झाला आहे. परिणामी भारतामध्ये सध्या LPG गॅसचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर १५-२० दिवस उशिराने मिळत आहेत. काही ठिकाणी तर जास्त किंमत आकारून सिलिंडर विकले जात आहेत.
पण या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता आणखी एक जुगाड समोर आला आहे. एका व्यक्तीने अनोखी चूल तयार केली आहे. हे गावातील मातीच्या चुलीचं अपग्रेड व्हर्जन आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चला पाहूया हा व्हायरल व्हिडिओ.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हा व्हिडिओ @HasnaZaruriHai या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या चुलीचं वैशिष्ट्य म्हणजे ती दोन भागांमध्ये विभागलेली आहे. एक भाग जिथून जळण्यासाठी लाकूड टाकले जाते आणि दुसरा भाग जिथून हवा खेळती राहते. ज्यामुळे निखाऱ्यावर फुंकर मारण्याची गरज लागत नाही. ही चूल L शेपमध्ये आहे आणि उभी असल्यामुळे किचनमध्ये कमी जागा घेते.
तसेच, ही चूल लोखंडाची असल्यामुळे भांड्याला जास्त उष्णता मिळते, परिणामी लाकूड कमी खर्च होतं.)
महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता livenews18 ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा