Ashok Kharat Viral Video Crime News: गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमध्ये कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातला (Ashok Kharat) नाशिक पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर काल अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Ashok Kharat Nashik Crime News)
तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये काही नामांकित महिला व सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. भविष्य जाणून घेण्यासाठी बडे बडे नेते, सेलिब्रिटी अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावायचे. तसेच अशोक खरातचा आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आरोपी धार्मिक विधीचा बहाणा करत महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवतो आणि त्यानंतर गैरवर्तन करतो, असं दिसून येते. हा व्हिडीओ अत्यंत आक्षेपार्ह असल्याने तो सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मात्र हा व्हिडीओ कुणीतरी व्हायरल केल्याचं दिसून येत आहे. (Ashok Kharat Nashik Crime News)
ईशान्येश्वर मंदिर जवळ अशोक खरातचं आलिशान फार्म हाऊस- (Ashok Kharat Nashik Crime News)
कॅप्टन अशोक खरात याला अटक केल्यानंतर सिन्नर तालुक्यातील मिरगावचे ईशानेश्वर मंदिर चर्चेत आले आहे. 16 ऑगस्ट 2010 रोजी मंदिराची स्थापना केली होती. याच मंदिराच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर कार्यरत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशानेश्वर महादेव मंदिराला भेट दिल्यानंतर मंदिर आणि अशोक खरात दोघेही चर्चेत आले. ईशान्येश्वर मंदिर जवळच अशोक खरातचा आलिशान फार्म हाऊस आहे. तिथे शनिवारी, रविवारी अशोक खरात येत असे, त्याच बरोबर, कोणी सेलिब्रिटी, व्हिआयपी आलेत तर त्यांच्यासोबत फार्महाऊसमध्ये मिटींग करत असल्याची स्थानिकांची माहिती आहे. या व्यतिरिक्त इतर शहरात देखील त्याची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचा पोलिसांनी संशय असून या मालमत्ता चा शोध घेतला जाणार आहे.
नेमकं प्रकरण काय? (Nashik Ashok Kharat Case)
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.