Gudhipadhva Viral Dance Video:सोशल मीडियावर अनेक मराठी गाणी व्हायरल होत असतात. ही गाणी ट्रेंडमध्ये असली की सोशल मीडियावरील अनेक कलाकार यावर रील करतात. यामुळे अनेकांना लोकप्रियता मिळते आणि याची सर्वत्र चर्चाही होते.
सोशल मीडियावर नव्या चित्रपटांमधील मराठमोळी गाणी चर्चेत असतात. पण कोणता सण आला तर त्यासंबंधित रिल्स करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मग स्वत:ची कला सादर करत अनेकजण मराठी सणसमारंभाच्या वेळेस अगदी हटके रिल्स शेअर करतात.
सध्या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला सण गुढीपाडवा एका दिवसावर येऊन ठेपला आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार खूप शुभ मानला जातो. महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
तर सोशल मीडियावरही गुढी उभारण्यापासून ते रांगोळीपर्यंत सगळ्याचेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या दोन महिलांच्या डान्सचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या दोन्ही महिला गुढीपाडव्याच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला महिलांचा डान्स पाहून तुम्हीदेखील नक्कीच कौतुक कराल. या व्हायरल व्हिडीओमध्ये २ महिलांनी ‘गुढीपाडव्याचा सण’ या गाण्यावर धमादेकार डान्स परफॉरमन्स केला आहे. अगदी सुंदर डान्स स्टेप्स करत गुढीपाडव्याच्या सणाची सुरूवात या महिलांनी जबरदस्त केली आहे.