Farmer Loan Waiver Villagewise List 2026: शासनाच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने जाहीर कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पदमसिंग पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पाचोरा येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जावर दोन लाख रुपयांपर्यंत (मुद्दल व व्याजासह) कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी २ लाखांपर्यंत कर्जमाफीची (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना) मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ केले जाणार असून, नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही बक्षीस मिळणार आहे. ३० सप्टेंबर २०२६ ही कागदपत्रे पूर्ण करण्याची महत्त्वाची तारीख आहे, अन्यथा शेतकरी अपात्र ठरू शकतात.