Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर…
लाडकी बहिन योजना फेब्रुवारी आणि मार्च हप्त्याची तारीख जाहीर: अर्थसंकल्पात राज्य
सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधीच्या निधीची घोषणा केली आहे. अशावेळी फेब्रुवारी आणि मार्च, या दोन महिन्यांचा लाभ एकाचवेळी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना आता फेब्रुवारी आणि मार्च हप्ता एकाच वेळी मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कधी मिळणार त्याची तारीखही समोर आली आहे. पण याबरोबरच काही महिलांचे लाभही बंद होणार आहे.
नुकताच झालेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधीच्या निधीची घोषणा केली आहे. अशावेळी फेब्रुवारी आणि मार्च, या दोन महिन्यांचा लाभ एकाचवेळी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी सरकारकडून दोन्ही महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत. १५ एप्रिलच्या आधी सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात ३ हजार रूपये जमा केले जातील, अशी माहिती आहे.
त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सध्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यात शेवटचा हप्ता मिळाला. त्यानंतर त्यांना पैसे मिळाले नाही. पण आता दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी मिळणार आहे.
दरम्यान, याचवेळी काही महिलांचा लाभही बंद होणार आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना ईकेवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. या काळात अनेक महिलांनी ईकेवायसी केली.
पण त्यामध्ये चुका झाल्या. त्यामुळेच सरकारने चुका दुरुस्त करण्याची अखेरची संधी दिली. ३१ मार्च २०२६ पर्यंत ईकेवायसीमध्ये काही चूक झाली असेल तर दुरूस्त करता येते. आता ३१ मार्चनंतर ज्या महिलांनी ईकेवायसी केलेली नाही, अथवा अपात्र असलेल्या महिलांना लाभ बंद होणार आहे.