Gold-Silver Price Today:देशात सोन्याच्या किमतींमध्ये घसरणीच सदर सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही घसरण सुरूच आहे. याशिवाय चांदीची किंमतही खाली आली आहे. 14 मार्चच्या सकाळी राजधानी नवी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून 10 ग्रॅमचा रेट हा 1,60,830 रुपयांवर आला आहे. त5 ,
र मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,60,680 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी नोंदवली गेली आहे. एक दिवस आधी नवी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा दर 2,000 रुपये म्हणजेच सुमारे 1.21 टक्क्यांनी घसरून 1,65,200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. तज्ज्ञांच्या मते, डॉलर मजबूत होणे आणि जागतिक आर्थिक धोरणांबाबत असलेली अनिश्चितता ही या घसरणीमागील मुख्य कारणे आहेत.
जागतिक परिस्थितीचा परिणाम?
पश्चिम आशियात वाढत असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी जगभरातील केंद्रीय बँकांना दीर्घकाळ कडक आर्थिक धोरण कायम ठेवावे लागू शकते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर सुमारे 5,088 डॉलर प्रति औंस इतका आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
नवी दिल्ली
24 कॅरेट सोने: ₹1,60,830 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोने: ₹1,47,440 प्रति 10 ग्रॅम
पुणे आणि बेंगळुर
24 कॅरेट सोने: ₹1,60,680 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोने: ₹1,47,290 प्रति 10 ग्रॅम
चांदीच्या दरातही चांगलीच घसरण
सोन्यानंतर महत्त्वाची असलेली चांदीही सतत स्वस्त होत आहे. 14 मार्चच्या सकाळी चांदीचा दर 2,79,800 रुपये प्रति किलोवर आला आहे. एक दिवस आधी नवी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीची किंमत 11,000 रुपये म्हणजेच 3.97 टक्क्यांनी घसरून 2,65,500 रुपये प्रति किलो झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट दर सुमारे 83.14 डॉलर प्रति औंस आहे.
विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात चांदीच्या किमतींनी 4 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला होता. मात्र सध्या बाजारातील बदलत्या परिस्थितीमुळे त्यात मोठी घसरण दिसून येत आहे.