New LPG Booking Update : गॅस ग्राहकांसाठी मोठे अपडेट ! सिलिंडर बुकिंगच्या नियमात बदल; आता दोन रिफिलमध्ये ‘इतक्या’ दिवसांचे अंतर अनिवार्य

New LPG Booking Update:इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ (New LPG Booking Update) आणि पुरवठा साखळीवर होणारा परिणाम लक्षात घेता, केंद्र सरकारने एलपीजी (LPG) सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी आणि साठेबाजीला चाप लावण्यासाठी आता नवीन ‘डे गॅप’ (Day Gap) नियम लागू करण्यात आला आहे.

काय आहे नवीन नियम? मिळालेल्या माहितीनुसार, आता ग्राहकांना एका सिलिंडरच्या बुकिंगनंतर दुसऱ्या सिलिंडरसाठी किमान १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वी अनेक ग्राहक एकाच महिन्यात दोन किंवा अधिक सिलिंडर बुक करत असत, (New LPG Booking Update) मात्र आता सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे १५ दिवस पूर्ण झाल्याशिवाय पुढील बुकिंग स्वीकारले जाणार नाही. देशातील वाढती मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता पाहता, गॅसचा साठा मर्यादित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

युद्धाचा परिणाम आणि साठेबाजीवर निर्बंध इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे जागतिक इंधन बाजारात भीतीचे वातावरण आहे.(New LPG Booking Update) अशा परिस्थितीत गॅस सिलिंडरची टंचाई भासू नये, यासाठी तेल कंपन्यांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा घरगुती वापराच्या सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जातो, अशा अवैध प्रकारांना या १५ दिवसांच्या नियमामुळे मोठ्या प्रमाणावर लगाम बसणार आहे.

ग्राहकांना होणारा फायदा आणि खबरदारी या नियमामुळे ज्यांना खरोखर गॅसची गरज आहे, अशा सर्वसामान्य ग्राहकांना वेळेवर पुरवठा मिळण्यास मदत होईल. गॅस एजन्सीकडून होणारी साठेबाजी थांबेल आणि पारदर्शकता येईल. (New LPG Booking Update) मात्र, ज्या कुटुंबांचा गॅस वापर जास्त आहे, त्यांनी आतापासूनच आपल्या वापराचे नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.

महत्त्वाची टीप: जर तुम्ही आज सिलिंडर बुक केला असेल, तर पुढील बुकिंगसाठी तुम्हाला किमान १५ दिवसांचा कालावधी पूर्ण होण्याची वाट पाहावी लागेल.(New LPG Booking Update) त्यापूर्वी केलेले बुकिंग सिस्टिमकडून रद्द केले जाऊ शकते.

Leave a Comment