Punyashlok Ahilyadevi Holkar Karjmafi Yojana: राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गेल्या काही वर्षांत बदलते हवामान, अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चात वाढ तसेच बाजारभावातील चढउतार यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कर्जफेड करणे कठीण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन
कर्जमाफीसोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करतात त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
या निर्णयामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि भविष्यातही वेळेवर कर्जफेड करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ काय आहे?
सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज राज्य सरकारकडून माफ केले जाईल. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केली.
अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा; थकीत व नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कसा होणार लाभ?
राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती ७.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज २०२५-२६ च्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आला आहे.
कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढ, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणांमुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. यासोबतच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येणार आहे.
शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता, त्याला कायमचा कर्जमुक्त करण्याचा संकल्प तसेच समितीच्या शिफारसींनुसार उपाययोजना सुरू केल्या जाणार आहेत.
विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे.
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून, या योजनेचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ असे करण्यात आले आहे.
कर्जमाफीचा कुणाला कसा मिळणार फायदा?◼️ ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
◼️ जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५०,००० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
◼️ या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेती व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.