एका जमिनीत किती हिस्सेधारक; विभाजन रेकॉर्ड तयार होणार, राज्य सरकारकडून अध्यादेश जारी Land Record Division

Land Record Division:महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ८५ नुसार शेतजमिनीवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिश्शाच्या विभाजनासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. एका जमिनीत किती हिस्सेधारक आहेत, त्या विभाजनाचा रेकॉर्ड यातून तयार होणार आहे. यासाठी शासनाने अध्यादेश जारी केला आहे.

राज्यात ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी आवश्यक करण्यात आला आहे. आयडी तयार करण्यासाठी जमिनीची अचूक जोडणी होणे आवश्यक आहे. सातबारामध्ये क्षेत्र व खातेदाराच्या नावासमोर सर्व माहिती असते.

परंतु त्या क्षेत्रात किती हिस्सेधारक आहेत हे देखील समोर येणे आवश्यक असल्यामुळे कलम ८५ नुसार शेतजमिनीवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीच्या हिस्सा विभाजनासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.

शासनाच्या अध्यादेशातील सूचना….फार्मर आयडी तयार करताना शेतजमिनीच्या अचूक जोडणीकरिता सामाईक खात्यातील प्रत्येक व्यक्तीसमोर त्याच्या हिश्शाची जमीन त्याच्या नावासमोर असणे आवश्यक राहणार आहे.

सामाईक खात्यातील व्यक्तीसमोर त्याच्या हिश्शाची जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये फेरफार नोंद, पीकपाहणी नोंद करताना अडचणी येतात. त्यामुळे खातेविभाजन करण्यासाठी नागरिकांना अर्ज करावा लागेल. तालुका, मंडळ स्तरावर शिबिर घेण्यात यावे. अशा सूचना शासनाने केल्या आहेत.

Leave a Comment