कृषी विभागात ९२०४ पदाची मेगा भरती! सविस्तर अपडेट लगेच पहा.Krushi Department Recruitment 2026

Krushi Department Recruitment 2026:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागात चाळणी प्रक्रियेत तसेच सरळ सेवेद्वारे भरण्यात येणारी कृषी सेवेतील पदे वित्त विभागाच्या मान्यतेअभावी दोन वर्षांपासून भरलेली नाही.

कृषी विभागामध्ये २७५०२ पदे मंजूर आहेत. यातील १८२९८ पदे भरली असून ९२०४ पदे रिक्त आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसचिव अमोल पाटणकर यांना निवेदन दिले आहे.

कृषी विभागाने राज्यसेवा आयोगाकडे मे आणि डिसेंबर २०२५ मध्ये मागणी पत्र पाठवूनही वित्त विभागाने त्यास मान्यता दिलेली नाही. अमरावती येथील युवा मोर्चा अध्यक्ष ऋषिकेश ठेलकर यांचा रिक्त पदभरतीबाबत पाठपुरावा सुरु आहे.

एमपीएससीद्वारे कृषी उपसंचालक (गट अ) मधील तंत्र अधिकारी आणि महाराष्ट्र कृषी सेवा (गट ब) कनिष्ठ संवर्ग, जि.प. कृषी अधिकारी (गट ब) आणि महाराष्ट्र प्रशासकीय सेवा (गट ब) अशी पदे भरण्यात येतात.

कृषी सेवेची तयारी करणारे विद्यार्थी अस्वस्थ

मे २०२५ मध्ये ८७ पदांचे मागणी पत्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यासाठी वित्त विभागाच्या उपसमितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

या पदांची जाहिरात २०२५ मध्ये प्रसिद्ध होऊन भरती होणे अपेक्षित होते. २०२६ मधील भरतीसाठी ४८४ मागणीसाठीही वित्त विभागाच्या उपसमितीकडे मागणी पत्र सादर केले आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा ३१ मे २०२६ रोजी नियोजित आहे. जर या पदांना मान्यता मिळाली नाही, तर २०२६ ची कृषी सेवेच्या जागांची जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. त्यामुळे कृषी सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

वित्त विभागाकडे पाठविण्यात आलेली पदे

मे २०२५

महाराष्ट्र कृषी सेवा गट ब :१५ पदे

महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ:७२ पदे

एकूण:८७

डिसेंबर २०२५

महाराष्ट्र कृषी सेवा गट अ:२४

महाराष्ट्र कृषी सेवा गट ब :७८

महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ :१३७

कृषी अधिकारी जिल्हा परिषद गट ब २३६

महाराष्ट्र प्रशासकीय सेवा गट ब पदांचे मागणी पत्र मान्यतेअभावी प्रलंबित आहे. अधिवेशनात या संबंधी चर्चा होईल, अशी आशा आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment