फक्त ‘या’ महिलांनाच करता येणार लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC! नवीन e-KYC यादीत नाव पहा.e-KYC Ladki Bahin Yojana

e-KYC Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना ई-केवायसी करण्याकरता ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी याआधी केवायसी केली नाही, त्याही अंतिम मुदतीआधी केवायसी करण्याकरता संकेतस्थळावर जात आहेत. मात्र, ही मुदत केवळ चुका दुरुस्त करण्याकरता देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. नव्याने केवायसी करण्याची मुदत संपली असल्याचं यातून स्पष्ट होतंय.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेचा लाभपारदर्शकपणे योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या प्रक्रियेमुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. मोबाइल नसणे, इंटरनेटचा अभाव, आधारकार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, ओटीपी न येणे, तसेच ऑनलाइन प्रश्नावलीतील तांत्रिक भाषा समजण्यास अडचणी आल्याने अनेक महिलांची प्रक्रिया अर्धवट राहिली, तर काहींच्या चुकीच्या नोंदी झाल्या.

अनेक ठिकाणी सायबर कॅफे किंवा मध्यस्थांच्या मदतीने ई-केवायसी करण्यात आली, मात्र या वेळी काही ठिकाणी चुकीची माहिती भरली गेली किंवा आवश्यक कागदपत्रे अपलोड न झाल्याने लाभार्थीची नावे योजनेतून तात्पुरती वगळली गेल्याचे सध्या उघड होत आहे. अनेक महिलांच्या पतींनी प्राप्तिकर भरला असल्याने त्या योजनेसाठी अपात्र ठरविल्या गेल्या. तर, इतर काही तांत्रिक अडचणींमुळे काही महिलांची ई केवायसी रखडली आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली होती.

 

 

Leave a Comment