सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? नवीन दर पहा.Gold Silver Price Today

Gold Silver Price Today: सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. आज चांदीचा भाव ३,९७३ रुपयांनी घसरुन २,३१,४६७ रुपये प्रति किलोवर आला आहे. तसंच सोन्याच्या किमतीतही प्रति १० ग्रॅम २,४१९ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

जीएसटीसह चांदीचा दर आता २,३८,४११ रुपये प्रति किलो झाला आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,३८,३९२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय.

सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची सुधारित यादी जाहीर ; एकुण 81 दिवस मिळणार सुट्टी.New School Holiday List Announcement 2026

२९ डिसेंबर रोजी सोन्यानं १३,८,१८१ रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत आता सोनं ३,७९९ रुपयांनी स्वस्त झालंय. तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरावरून (२,४३,४८३ रुपये) ११,९७१ रुपयांनी घसरली आहे.

सोमवारची स्थिती आणि आजची बाजार सुरुवात

सोमवारी चांदी जीएसटीशिवाय २,४३,४८३ रुपये प्रति किलो या विक्रमी स्तरावर उघडली होती आणि २,३५,४४० रुपयांवर बंद झाली होती. त्याचप्रमाणे सोनं जीएसटीशिवाय १३,८,१६१ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडून १३,६,७८१ रुपयांवर बंद झालं होतं.

आज बाजाराच्या सुरुवातीला विना जीएसटी सोन्याचा भाव १,३४,३७२ रुपयांवर उघडला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे (IBJA) हे दर जाहीर करण्यात आले आहेत.

आयबीजेए दिवसातून दोनदा जारी करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला ‘हा’ शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका

जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल;नवीन आता कुणाला मिळणार किती धान्य?Ration Card Disruption New Rule

या वर्षातील सोने-चांदीची विक्रमी वाटचाल

चालू वर्षात सोन्याच्या किमतीत आतापर्यंत ५८,६२२ रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी १४५,४५० रुपयांनी वधारली आहे. एकट्या डिसेंबर महिन्यात चांदी ७१,०८१ रुपयांनी आणि सोनं १०,१९० रुपयांनी महागलंय. सोमवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतरही या वर्षातील एकूण वाढ लक्षणीय आहे.

कॅरेटनुसार सोन्याचे ताजे दर (विना मेकिंग चार्ज)

२३ कॅरेट गोल्ड: २,४०७ रुपयांच्या घसरणीसह १,३३,२३६ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह याची किंमत १,३७,८४० रुपये झाली आहे.

२२ कॅरेट गोल्ड: २,२१५ रुपयांनी घसरून १,२३,०७६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं. जीएसटीसह हा दर १,२६,७६८ रुपये आहे.

१८ कॅरेट गोल्ड: १,८१४ रुपयांच्या घसरणीसह १,००,७७२ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं असून जीएसटीसह याची किंमत १,०३,७९५ रुपये आहे.

१४ कॅरेट गोल्ड: १,४१५ रुपयांनी स्वस्त होऊन ७८,६०२ रुपयांवर उघडलं आणि जीएसटीसह ८०,९६० रुपयांवर पोहोचलं आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment